Lokmat Money > बिझनेस न्यूज > नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!

नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!

Squid Game : नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'स्क्विड गेम'च्या तिसऱ्या सीझनला जगभरात चांगलीच लोकप्रियता मिळाली. मात्र, याचा शेवट प्रेक्षकांना आवडला नसल्याचा परिणाम थेट शेअर बाजारात पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:16 IST2025-06-30T14:56:23+5:302025-06-30T15:16:46+5:30

Squid Game : नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'स्क्विड गेम'च्या तिसऱ्या सीझनला जगभरात चांगलीच लोकप्रियता मिळाली. मात्र, याचा शेवट प्रेक्षकांना आवडला नसल्याचा परिणाम थेट शेअर बाजारात पाहायला मिळत आहे.

Squid Game Stocks Sink as Blockbuster Ends With Mixed Reviews | नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!

नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!

Squid Game :नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेला 'स्क्विड गेम' या प्रसिद्ध कोरियन मालिकेचा तिसरा सीझन जगभरात चर्चेत आहे. २७ जून रोजी प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हा सीझन स्ट्रीमिंग चार्टमध्ये अव्वल स्थानी पोहोचला. मात्र, प्रेक्षकांना या सीझनचा शेवट फारसा आवडला नाही. अनेकांनी याला 'घाईघाईने संपवलेली कथा' असे म्हटले आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. मात्र, याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.

शेअर बाजारात मोठा धक्का
या निराशाजनक प्रतिक्रियेचा थेट परिणाम दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारावर दिसून आला. 'स्क्विड गेम'च्या मुख्य अभिनेता ली जंग-जे यांच्या 'आर्टिस्ट कंपनी'चे शेअर्स सोमवारी तब्बल २१% नी कोसळले. त्यांच्या दुसऱ्या शाखेच्या 'आर्टिस्ट स्टुडिओ इंक.' चे शेअर्स २४% नी घसरले. इतकेच नाही, तर या शोमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स देणारी कंपनी डेक्सटर स्टुडिओचे शेअर्सही ८.५% नी खाली आले. या कंपन्या थेट 'स्क्विड गेम'शी जोडल्या गेल्या होत्या, त्यामुळे प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियेचा फटका त्यांना बसला.

समीक्षक खुश, पण प्रेक्षक नाराज
'स्क्विड गेम 3' ने जरी स्ट्रीमिंग चार्टमध्ये विक्रम केला असला तरी, प्रेक्षकांच्या मतामध्ये मोठी तफावत दिसून येते. रॉटन टोमॅटोज वेबसाइटवर समीक्षकांनी या सीझनला ८३% चांगले रेटिंग दिले, तर सामान्य प्रेक्षकांनी फक्त ५१% रेटिंग दिले. म्हणजेच, समीक्षकांना हा शो आवडला असला तरी, प्रेक्षकांच्या मनात नाराजी आहे.

सोलमधील पॉप कल्चर तज्ज्ञांच्या मते, प्रेक्षकांची मुख्य तक्रार शोच्या शेवटाबद्दल आहे. कथेचा शेवट त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नसल्याने त्यांना निराशा झाली. पहिल्या सीझनने निर्माण केलेली जादू आणि चर्चा या सीझनमध्ये कमी पडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

वाचा - घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?

'स्क्विड गेम'ने घडवला होता इतिहास
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'स्क्विड गेम'चा पहिला सीझन केवळ एक शो नव्हता, तर एक जागतिक घटना होती. त्याने कोरियन मनोरंजक उद्योगाला एक नवी ओळख दिली. त्यांचे हिरवे ट्रॅकसूट आणि गुलाबी मास्क असलेले गार्ड्स पॉप संस्कृतीचा भाग बनले. या शोने नेटफ्लिक्ससाठी अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि दक्षिण कोरियाच्या कलाकारांना आणि कंपन्यांना रातोरात जगभर प्रसिद्ध केले. मात्र, तिसऱ्या सीझनला मिळालेल्या संमिश्र प्रतिसादामुळे या कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
 

Web Title: Squid Game Stocks Sink as Blockbuster Ends With Mixed Reviews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.