रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सॉवरेन गोल्ड बाँडच्या (Sovereign Gold Bond) दुसऱ्या हप्त्याची रिडेम्पशन किंमत जाहीर करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने २०१७-१८ सिरीज II साठी सॉवरेन गोल्ड बाँडची रिडेम्पशन किंमत प्रति ग्रॅम ९९२४ निश्चित केली आहे. ही सिरीज २८ जुलै २०२५ रोजी मॅच्युअर होत आहे.
२५०.६७ टक्के एवढा परतावा -
गेल्या ८ वर्षांत, सॉवरेन गोल्ड बाँडने २५०.६७ टक्के एवढा परतावा दिला आहे. यामध्ये २.५ टक्के व्याज (अर्धवार्षिक देय) समाविष्ट नाही. महत्वाचे म्हणजे, ही रिडेम्पशन किंमत २१ जुलै ते २५ जुलै दरम्यान इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची सरासरी किंमत आहे.
2017 मध्ये जारी झाली होती सॉवरेन गोल्ड बॉन्डची ही सीरीज -
हा सॉवरेन गोल्ड बाँड जुलै २०१७ मध्ये जारी करण्यात आला होता. तेव्हा त्याची किंमत प्रति ग्रॅम २८३० रुपये एवढी होती. दरम्यान, डिजिटल अॅप्लिकेशन असलेल्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट मिळाली होती. महत्वाचे म्हणजे, सॉवरेन गोल्ड बाँडने गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्यासह अनेक सुविधा दिल्या आहेत. मॅच्युरिटीच्या वेळी गुंतवणूकदारांना कर सवलत मिळते. तसेच, हा गोल्ड बॉन्ड निश्चित परताव्याची हमीही देतो.
सॉवरेन गोल्ड बॉन्डचे फायदे ? -
आजच्या काळात, सॉव्हरेन गोल्ड बाँडकडे फिजिकल सोन्याला पर्याय म्हणून बघितले जाते. जात आहे. तसेच, सॉवरेन गोल्ड बाँडच्या, शुद्धतेची आणि तो ठेवण्याचीही चिंता करण्याची गरज नाही. सॉवरेन गोल्ड बाँड ५ वर्षांच्या गुंतवणुकीनंतर रिडीम करता येतो. याशिवाय तो सेकेंडरी मार्केटमध्येही वापरता येतो.