Lokmat Money > बिझनेस न्यूज > Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स

Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स

Smart Coworking IPO: गुरुग्रामस्थित स्मार्टवर्क्स को-वर्किंग स्पेसेस लिमिटेडचा आयपीओ आज सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आहे. आयपीओमध्ये गुंतवणूकदार १४ जुलैपर्यंत बोली लावू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:26 IST2025-07-10T13:26:53+5:302025-07-10T13:26:53+5:30

Smart Coworking IPO: गुरुग्रामस्थित स्मार्टवर्क्स को-वर्किंग स्पेसेस लिमिटेडचा आयपीओ आज सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आहे. आयपीओमध्ये गुंतवणूकदार १४ जुलैपर्यंत बोली लावू शकतात.

Smart Coworking IPO open for subscription Know details including issue price gmp before investing | Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स

Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स

Smart Coworking IPO: गुरुग्रामस्थित स्मार्टवर्क्स को-वर्किंग स्पेसेस लिमिटेडचा आयपीओ आज सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आहे. आयपीओमध्ये गुंतवणूकदार १४ जुलैपर्यंत बोली लावू शकतात. या पब्लिक ऑफरच्या माध्यमातून ५८२.५६ कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. आयपीओसाठी प्राइस बँड ३८७ ते ४०७ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलाय. हा आयपीओ फेस इश्यू आणि ऑफर फॉर सेल (OFS) अशा दोन भागांमध्ये विभागलेला आहे. कंपनी ४४ कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करणार आहे, तर ऑफर फॉर सेल १३७ कोटी रुपये आहे.

किती आहे जीएमपी?

स्मार्टवर्क्स को-वर्किंग स्पेसेस लिमिटेडच्या आयपीओचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) या दोन्ही ठिकाणी लिस्ट केले जातील. आयपीओ सुरू होण्यापूर्वीच कंपनीचे शेअर्स प्रायमरी मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. मार्केट ऑब्झर्व्हर्सच्या मते, स्मार्टवर्क्सचा जीएमपी आज २७ रुपयांच्या प्रीमियमवर होता. म्हणजेच आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?

किती करावी लागेल गुंतवणूक?

कंपनीने एकूण ३६ शेअर्सचा एक लॉट तयार केलाय. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना किमान ३६ शेअर्ससाठी बोली लावावी लागणार आहे. आयपीओच्या शेअर्सचं वाटप १५ जुलै २०२५ रोजी होण्याची शक्यता आहे, तर शेअर्सची लिस्टिंग १७ जुलै २०२५ रोजी अपेक्षित आहे. या आयपीओचे रजिस्ट्रार एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाइम) आहे. जेएम फायनान्शियल, बीओबी कॅपिटल मार्केट्स, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस आणि कोटक महिंद्रा कॅपिटल हे प्रमुख व्यवस्थापक आहेत. 

यामध्ये एका लॉटसाठी १४,६५२ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला बोली संथ गतीनं सुरू असली तरी येत्या काही दिवसांत त्यात वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Smart Coworking IPO open for subscription Know details including issue price gmp before investing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.