Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चांदी कोसळली, सोन्याची झळाळी कमी झाली! जागतिक बाजारातील वेग मंदावल्याने परिणाम

चांदी कोसळली, सोन्याची झळाळी कमी झाली! जागतिक बाजारातील वेग मंदावल्याने परिणाम

गुंतवणूकदारांनी नफा वसूल केल्याने बाजारात उलथापालथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 09:29 IST2026-01-23T09:29:04+5:302026-01-23T09:29:28+5:30

गुंतवणूकदारांनी नफा वसूल केल्याने बाजारात उलथापालथ

Silver falls, gold loses steam! Slowdown in global markets results | चांदी कोसळली, सोन्याची झळाळी कमी झाली! जागतिक बाजारातील वेग मंदावल्याने परिणाम

चांदी कोसळली, सोन्याची झळाळी कमी झाली! जागतिक बाजारातील वेग मंदावल्याने परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: जागतिक बाजारातील वेग मंदावल्याने आणि गुंतवणूकदारांनी नफा वसूल केल्याने देशांतर्गत सोनं आणि चांदीच्या किमती विक्रमी उच्चांकावरून खाली आल्या आहेत. सुरक्षित गुंतवणुकीवरील मागणी कमी झाल्यामुळे हा घसरण झाल्याची माहिती ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिली. चांदी गुरुवारी तब्बल १४,३०० रुपये म्हणजेच ४.३ टक्क्यांनी घसरून ३,२०,००० रुपये प्रति किलो (सर्व करांसह) इतकी झाली. 

चांदीच्या किमतीतील वेगवान घसरण ही जागतिक बाजारातील भीती कमी झाल्याचे चित्र आहे. ‘ट्रेड वॉर प्रीमियम’ कमी झाल्याने गुंतवणूकदार नफा-वसुलीकडे वळले.
-अमीर मकडा, विश्लेषक, चॉईस ब्रोकिंग

सोने-चांदी दरातील बदल 

धातू    सध्याची किंमत    घसरण (₹)

सोने     १,५७,२०० रु. प्रति १० ग्रॅम    २,५०० रु.
चांदी    ३,२०,००० रु. प्रति किलो    १४,३०० रु.
(सर्व दर करांसह - ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार)

पुढे किमती वाढू शकतात

तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या बाजारात झालेली ही घसरण ही साहजिकच आहे. जागतिक तणाव थोडा कमी झाला असला तरी, आयात शुल्क वाढण्याची शक्यता आणि काही भू-राजकीय जोखीम यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंना पुढील काळात पुन्हा जास्त किंमत मिळू शकते.
डिजिटल चांदी काळवंडली; ईटीएफची डुबकी/आपला पैसा

Web Title : चाँदी लुढ़की, सोना फीका: वैश्विक मंदी का कीमतों पर असर

Web Summary : वैश्विक बाजार में सुस्ती और मुनाफावसूली के कारण चांदी ₹14,300/किलो गिरी, जबकि सोना ₹2,500/10 ग्राम सस्ता हुआ। विशेषज्ञों का अनुमान है कि भू-राजनीतिक जोखिमों और आयात शुल्क की चिंताओं से कीमतों में फिर से उछाल आ सकता है।

Web Title : Silver Plummets, Gold Dims: Global Slowdown Impacts Prices.

Web Summary : Silver prices crashed ₹14,300/kg, while gold fell ₹2,500/10g amid global market slowdown and profit-taking. Experts predict potential price rebound due to geopolitical risks and import duty concerns. Demand shifted from safe haven assets.