Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एकाच झटक्यात चांदी १६०० रुपयांपेक्षा अधिक महागली, सोन्याचे दरही वाढले; पाहा १४ ते २४ कॅरेट Gold रेट

एकाच झटक्यात चांदी १६०० रुपयांपेक्षा अधिक महागली, सोन्याचे दरही वाढले; पाहा १४ ते २४ कॅरेट Gold रेट

Gold Silver Price 28 Nov : सराफा बाजारात आज, शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी सोने आणि चांदीचे दर पुन्हा वाढले. एकाच दिवसात चांदीचा भाव १६१९ रुपयांनी वाढला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:46 IST2025-11-28T15:46:02+5:302025-11-28T15:46:43+5:30

Gold Silver Price 28 Nov : सराफा बाजारात आज, शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी सोने आणि चांदीचे दर पुन्हा वाढले. एकाच दिवसात चांदीचा भाव १६१९ रुपयांनी वाढला.

Silver became more expensive than Rs 1600 in one fell swoop gold prices also increased See 14 to 24 carat gold rates | एकाच झटक्यात चांदी १६०० रुपयांपेक्षा अधिक महागली, सोन्याचे दरही वाढले; पाहा १४ ते २४ कॅरेट Gold रेट

एकाच झटक्यात चांदी १६०० रुपयांपेक्षा अधिक महागली, सोन्याचे दरही वाढले; पाहा १४ ते २४ कॅरेट Gold रेट

Gold Silver Price 28 Nov : सराफा बाजारात आज, शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी सोने आणि चांदीचे दर पुन्हा वाढले. एकाच दिवसात चांदीचा भाव १६१९ रुपयांनी वाढला, तर सोनं ६०९ रुपयांनी महाग झालं. २४ कॅरेट सोनं आज ६०९ रुपयांनी महाग होऊन १२६६६६ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडलं. जीएसटीसह १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव आता १३०४६५ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

तर आज चांदी १६१९ रुपयांनी वाढून १६४२८६ रुपये प्रति किलो दरानं उघडली. जीएसटीसह चांदीचा भाव १६९२१४ रुपये प्रति किलो झाला आहे. गुरुवारी चांदी जीएसटी वगळता १६२६६७ रुपये प्रति किलो आणि सोनं जीएसटी वगळता १२६०५७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते.

संपत्ती लपवणाऱ्यांना आयकर विभागाचा दंडुका; विदेशी संपत्ती लपवणारे २५ हजार करदाते ‘रडार’वर

कॅरेटनुसार सोन्याचे दर

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ६०७ रुपयांनी महाग होऊन १२६१५९ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. जीएसटीसह याची किंमत आता १२९९४३ रुपये झाली आहे. (यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही).

२२ कॅरेट सोन्याची किंमत ५५८ रुपयांनी वाढून ११६०२६ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचली. जीएसटीसह हा दर ११९५०६ रुपये झालाय.

१८ कॅरेट सोने ४५८ रुपयांच्या तेजीसह ९५००० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचलं आणि जीएसटीसह याची किंमत ९७८५० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.

१४ कॅरेट सोन्याचा दर ३५७ रुपयांनी कमी झाला असून तो आज ७४१०० रुपये वर उघडला आणि जीएसटीसह तो ७६३२३ रुपये झाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन दिवसातून दोनदा म्हणजेच दुपारी १२ च्या सुमारास आणि सायंकाळी ५ च्या आसपास दर जारी करते.

Web Title : चांदी 1600 रुपये से अधिक महंगी, सोने के दाम भी बढ़े

Web Summary : सराफा बाजार में आज सोने और चांदी की कीमतों में उछाल आया। चांदी 1619 रुपये बढ़ी, जबकि सोना 609 रुपये प्रति 10 ग्राम महंगा हुआ। 24 कैरेट सोने की कीमत जीएसटी सहित 126666 रुपये प्रति 10 ग्राम पर खुली।

Web Title : Silver Soars Over ₹1600, Gold Prices Rise Sharply Today

Web Summary : Gold and silver prices surged in the Sarafa market today. Silver jumped by ₹1619, while gold increased by ₹609 per 10 grams. The price of 24-carat gold opened at ₹126666 per 10 grams, including GST.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.