Gold Silver Price 3 Dec : बुधवार, ३ डिसेंबर रोजी सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. चांदीने आज आपला सर्वकालीन उच्चांक गाठला. आज चांदी जीएसटी (GST) शिवाय ₹१,७८,६८४ प्रति किलो दराने उघडली आणि जीएसटीसह (GST) तिची किंमत ₹१,८४,०४४ प्रति किलो झाली.
मंगळवारी चांदी जीएसटीशिवाय ₹१,७४,६५० प्रति किलो आणि सोने जीएसटीशिवाय ₹१,२७,५९३ प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. आज चांदी ₹४,०३४ नं वाढून उघडली. तर दुसरीकडे सोनं आता १७ ऑक्टोबर रोजीच्या सर्वकालीन उच्चांक ₹१,३०,८७४ पेक्षा केवळ ₹२,३२४ स्वस्त राहिलं आहे.
कॅरेटनुसार सोन्याचे दर
२३ कॅरेट सोने ₹९५३ नं महाग होऊन ₹१,२८,०३५ प्रति १० ग्रॅम दराने उघडलं. जीएसटीसह त्याची किंमत आता ₹१,३१,८७६ झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्ज अजून जोडलेला नाही.
२२ कॅरेट सोन्याची किंमत ₹८७७ नं वाढून ₹१,१७,७५२ प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह ती ₹१,२१,२८४ आहे.
१८ कॅरेट सोनं ₹७१८ च्या तेजीसह ₹९६,४१३ प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आहे आणि जीएसटीसह त्याची किंमत ₹९९,३०५प्रति १० ग्रॅमवर पोहोचली
१४ कॅरेट सोन्याचा दरही ₹५६० नं वाढला आहे. आज ते ₹७४,६४२ वर उघडलं आणि जीएसटीसह त्याची किंमत ₹७७,४५८ झाली आहे.
