स्मॉलकॅप कंपनी सिक्को इंडस्ट्रीजचे शेअर गेल्या काही दिवसांपासून बाजारात धुमाकूळ घालत आहेत. कंपनीचे शेअर गुरुवारी २० टक्क्यांच्या अपर सर्किटसह १२४.२० रुपयांवर पोहोचले. यानंतर कंपनीच्या शेअरनं ५२ आठवड्यांच्या उच्चांक गाठला. गेल्या ३ दिवसांत सिक्को इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये २७ टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आहे. कंपनीच्या शेअर्समधील ही वाढ बोनस शेअर वाटप आणि शेअर विभाजन करण्याच्या घोषणेनंतर झाली आहे. कंपनीच्या बोर्डानं शनिवार, १८ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत बोनस शेअर जारी करण्यास आणि स्टॉक स्प्लिटला मंजुरी दिली आहे.
१ मोफत शेअर आणि शेअरचं विभाजन
सिक्को इंडस्ट्रीजच्या बोर्डानं १:१ च्या प्रमाणात बोनस शेअर जारी करण्यास मंजुरी दिली आहे. म्हणजेच, कंपनी प्रत्येक १ शेअरवर १ बोनस शेअर देणार आहे. याव्यतिरिक्त, सिक्को इंडस्ट्रीजच्या बोर्डाने १:१० च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. म्हणजेच, कंपनी आपला शेअर १० तुकड्यांमध्ये विभाजित करेल. सिक्को इंडस्ट्रीज १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या आपल्या शेअरचे १-१ रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या १० शेअर्समध्ये विभाजन करेल. स्मॉलकॅप कंपनीनं अद्याप बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटच्या रेकॉर्ड डेटची घोषणा केलेली नाही.
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
महिन्याभरात ८२% ची वाढ
सिक्को इंडस्ट्रीजचे शेअर गेल्या एका महिन्यात ८२ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. स्मॉलकॅप कंपनीचे शेअर २३ सप्टेंबर २०२५ रोजी ६७.७७ रुपयांवर होते. कंपनीचे शेअर २३ ऑक्टोबर २०२५ रोजी १२४.२० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या चार वर्षांत सिक्को इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये ३८५ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. कंपनीचे शेअर या कालावधीत २५.४६ रुपयांवरून वाढून १२४ रुपयांच्या पार गेले आहेत. सिक्को इंडस्ट्रीजच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १२४.२० रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांक ६०.६५ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप गुरुवारी २७१ कोटी रुपयांच्या पार पोहोचलं आहे.
(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)