Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स

Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स

Shyam Dhani Industries IPO: पाहा कोणती आहे ही कंपनी आणि किती मोठा आहे व्यवसाय. या कंपनीच्या आयपीओच्या ३८.५ कोटी रुपयांच्या इश्यू आकाराच्या तुलनेत तब्बल २५,००० कोटी रुपयांच्या शेअर्ससाठी बोली मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:43 IST2025-12-26T11:40:38+5:302025-12-26T11:43:31+5:30

Shyam Dhani Industries IPO: पाहा कोणती आहे ही कंपनी आणि किती मोठा आहे व्यवसाय. या कंपनीच्या आयपीओच्या ३८.५ कोटी रुपयांच्या इश्यू आकाराच्या तुलनेत तब्बल २५,००० कोटी रुपयांच्या शेअर्ससाठी बोली मिळाली आहे.

Shyam Dhani Industries IPO allotment data Spice company asks for rs 38 crore investors invest rs 25000 crore see details | Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स

Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स

Shyam Dhani Industries IPO: गेल्या आठवड्यात शेअर बाजारात केएसएच इंटरनॅशनलच्या आयपीओसाठी १६ ते १८ डिसेंबर दरम्यान बोली लावली गेली होती, मात्र शेवटच्या दिवसापर्यंत त्याला १०० टक्के सबस्क्रिप्शनही मिळालं नाही आणि तो ८७ टक्क्यांवरच अडकला. याउलट, जयपूरमधील मसाला उत्पादक एसएमई कंपनी श्याम धनी इंडस्ट्रीजचा आयपीओ गेल्या शुक्रवारी ९८८ पट सबस्क्रिप्शनसह बंद झाला. या आयपीओच्या ३८.५ कोटी रुपयांच्या इश्यू आकाराच्या तुलनेत तब्बल २५,००० कोटी रुपयांच्या शेअर्ससाठी बोली मिळाली आहे.

९८८ पट ओव्हर सबस्क्रिप्शन आणि नवा विक्रम

श्याम धनी इंडस्ट्रीजचा आयपीओ तीन दिवसांच्या कालावधीत ९८८ पट सबस्क्राईब झाला. कंपनीनं आयपीओद्वारे ३६.५८ लाख शेअर्स विकण्याची घोषणा केली होती, परंतु कंपनीला ६,२२,०९७ अर्जांच्या माध्यमातून ३६१.५५ कोटी शेअर्ससाठी बोली मिळाली. या कामगिरीमुळे श्याम धनी इंडस्ट्रीज २०२५ मधील सर्वाधिक सबस्क्राईब होणारा एसएमई आयपीओ ठरला आहे. तसेच, हा आतापर्यंतचा पाचवा सर्वाधिक सबस्क्राईब झालेला एसएमई आयपीओ बनला आहे. यामुळेच आज त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम १०० टक्क्यांवर पोहोचला असून, या शेअरची लिस्टिंग दुप्पट किमतीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?

एसएमई आयपीओमधील गुंतवणुकीचा ओघ

एसएमई आयपीओ सेगमेंटमध्ये गेल्या तीन वर्षांपासून गुंतवणूकदारांची प्रचंड मागणी दिसून येत आहे. अनेक आयपीओमध्ये पुरवठ्यापेक्षा कितीतरी जास्त मागणी नोंदवली गेली आहे. या यादीत २०२४ हे वर्ष अग्रस्थानी असून सर्वाधिक सबस्क्राईब झालेल्या १० पैकी ६ आयपीओ याच वर्षातील आहेत. यामध्ये 'HOAC' चा २०२४ मधील ऑफर १,९६३ पट सबस्क्रिप्शनसह सर्वात वर आहे, त्यानंतर 'NACDAC इन्फ्रास्ट्रक्चर' १,५४५ पट आणि 'Hamps Bio' १,०४८ पट सबस्क्रिप्शनसह या यादीत आहे. ही तेजी २०२५ मध्येही कायम असून श्याम धनी इंडस्ट्रीज (९८८ पट) आणि 'Austere Systems' (७५० पट) यांना मिळालेला प्रतिसाद रिटेल आणि एचएनआय गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता दर्शवतो. २०२३ मध्येही 'Kay Cee Energy' (७३९ पट) आणि 'Kahan Packaging' (७१४ पट) सारख्या आयपीओमध्ये अशीच मजबुती दिसून आली होती.

कंपनीची पार्श्वभूमी आणि आयपीओचा तपशील

श्याम धनी इंडस्ट्रीज 'श्याम' ब्रँड अंतर्गत मसाले आणि किराणा उत्पादनांची निर्मिती व विक्री करते. कंपनी १६० हून अधिक प्रकारचे दळलेले, मिश्रित आणि अख्ख्या मसाल्यांवर प्रक्रिया करते. याशिवाय काळं मीठ, सैंधव मीठ, तांदूळ, पोहे आणि कसुरी मेथी यांसारख्या उत्पादनांचा व्यापारही कंपनी करते. कंपनीचा निर्मिती प्रकल्प राजस्थानमधील जयपूर येथे असून राम अवतार अग्रवाल, ममता देवी अग्रवाल आणि विठ्ठल अग्रवाल हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.

श्याम धनी इंडस्ट्रीजच्या आयपीओसाठी ६५ ते ७० रुपये प्रति शेअर असा प्राईस बँड ठेवण्यात आला होता. ७० रुपयांच्या वरच्या किमतीनुसार कंपनीचे मूल्य सुमारे १४४.६ कोटी रुपये होतं. ग्रे मार्केटमध्ये याची किंमत ७० रुपयांच्या वर ६५-७० रुपये प्रीमियम दर्शवत असल्यानं, लिस्टिंगच्या वेळी याची किंमत १४० रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : मसाला कंपनी का आईपीओ 988 गुना सब्सक्राइब, निवेशकों ने लगाए ₹25,000 करोड़।

Web Summary : श्याम धनी इंडस्ट्रीज के आईपीओ को निवेशकों से जबरदस्त प्रतिक्रिया मिली, जो 988 गुना सब्सक्राइब हुआ। एसएमई आईपीओ को ₹38.5 करोड़ के निर्गम आकार के मुकाबले ₹25,000 करोड़ की बोलियाँ मिलीं, जिससे लिस्टिंग मूल्य दोगुना होने की संभावना है। एसएमई आईपीओ में भारी निवेश आ रहा है।

Web Title : Spice company's IPO oversubscribed 988 times, investors bid ₹25,000 crore.

Web Summary : Shyam Dhani Industries' IPO saw massive oversubscription, reaching 988 times, driven by strong investor demand. The SME IPO garnered bids worth ₹25,000 crore against an issue size of ₹38.5 crore, potentially leading to a doubled listing price. SME IPOs are attracting significant investment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.