अमेरिकन टॅरिफमुळे वस्त्रोद्योगाला धक्का बसला असला तरी, भारत जागतिक स्तरावर आपल्या कपड्यांना नव्या बाजारपेठा मिळवून देण्यासाठी ४० देशांत मोठ्या प्रमाणावर प्रचार मोहीम राबविणार आहे. यामुळे स्थानिक उद्योगांना निर्यात वाढविण्याची संधी मिळेल.
कसा होणार भारतीय कपड्यांचा प्रचार?
-निर्यात प्रोत्साहन मंडळे आघाडीवर; देशांनुसार बाजारपेठेचा शोध घेणे; जास्त मागणी असलेल्या कपड्यांची यादी करणे
-सुरत, पानिपत, तिरुपूर, भदौहीसारख्या वस्त्र निर्मिती केंद्रांना निर्यातीच्या संधींची माहिती देणे; आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, व्यापार मेळाव्यांचे आयोजन
-युनिफाईड बॅण्ड इंडिया अभियानास चालना; मुक्त व्यापार करार व आयएसओ, फेअर ट्रेड, ऑर्गेनिक कॉटन यासारखी प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी मार्गदर्शन
कोणत्या ४० देशांत करणार प्रचार? :
युनायटेड किंग्डम, जपान, दक्षिण कोरिया, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, नेदरलँड, पोलंड, कॅनडा, मेक्सिको, रशिया, बेल्जियम, तुकीं, संयुक्त अरब अमिराती आणि ऑस्ट्रेलियासह इतर देश.
याच देशांत का करणार प्रचार?
५९० अब्ज डॉलर्स इतक्या किमतीचे कपडे हे ४० देश आयात भारताला मोठी संधी करत असल्याने
भारताचा कापड व्यापार किती?
६ टक्के इतका जागतिक कापड व्यापारात भारताचा सध्याचा वाटा भारत सध्या जागतिक स्तरावर ६व्या क्रमांकाचा कापड निर्यातदार देश