lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > साखरेच्या भावात तेजीचे संकेत, सणामुळे मागणी वाढली, ऊस उत्पादनात घट

साखरेच्या भावात तेजीचे संकेत, सणामुळे मागणी वाढली, ऊस उत्पादनात घट

राज्यातील महापूर व उसाचे उत्पन्न घटल्यामुळे आॅगस्ट महिन्यामध्ये साखरेच्या भावात प्रतिक्विंटल शंभर ते दोनशे रुपये तेजी असून यात आणखी वाढ होईल, असा अंदाज साखर व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 03:25 AM2019-08-20T03:25:01+5:302019-08-20T03:25:15+5:30

राज्यातील महापूर व उसाचे उत्पन्न घटल्यामुळे आॅगस्ट महिन्यामध्ये साखरेच्या भावात प्रतिक्विंटल शंभर ते दोनशे रुपये तेजी असून यात आणखी वाढ होईल, असा अंदाज साखर व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

The sharp rise in the price of sugar, the increase in demand due to the festival, the decline in sugarcane production | साखरेच्या भावात तेजीचे संकेत, सणामुळे मागणी वाढली, ऊस उत्पादनात घट

साखरेच्या भावात तेजीचे संकेत, सणामुळे मागणी वाढली, ऊस उत्पादनात घट

- रमेश कोठारी

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : राज्यातील महापूर व उसाचे उत्पन्न घटल्यामुळे आॅगस्ट महिन्यामध्ये साखरेच्या भावात प्रतिक्विंटल शंभर ते दोनशे रुपये तेजी असून यात आणखी वाढ होईल, असा अंदाज साखर व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.
राज्यात कोल्हापूर परिसरात आलेल्या महापुरात उभ्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळी भागात जनावरांच्या चाºयासाठी उसाची मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीमुळे सन २०१९-२०२० च्या गळीत हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना ऊस टंचाई निर्माण होणार आहे. यामुळे साखरेला बाजारभाव बºयापैकी चांगले राहतील, अशी चर्चा आहे. उत्तर प्रदेशात साखर उत्पादन अधिक होते. परंतु तेथे अन्य राज्यापेक्षाही साखरेचे भाव अधिक असल्यामुळे राज्यातही साखरेचे भाव वाढते आहेत. उत्तर प्रदेशात साडेतीन हजारांपेक्षा अधिक भाव आहेत.
आॅगस्ट महिन्यात दोनशे रुपयांपेक्षा अधिक तेजी साखरेच्या भावात राहिल्यामुळे बाजारभाव वाढते राहण्याची शक्यता आहे. श्रावण व भाद्रपद महिना हा सणासुदीचा महिना पुढे दसरा, दीपावली आदी सणामुळे साखरेला मागणी वाढती आहे. भाव तेजीत असल्यामुळे ज्याला दोनशे पोती साखर घ्यावयाची तो ४०० ते ५०० पोती साखर घेतो यामुळे मागणी वाढती आहे. सणामुळे मागणी वाढली असल्याचे साखर व्यापारी दिनेश बडजाते व पियुष कर्नावट यांनी सांगितले.

कोटा कमी
आॅगस्ट महिन्यात शासनाने जाहीर केलेल्या साखर विक्री कोट्यापैकी १० आॅगस्टपर्यंत ८० टक्के साखरेची विक्री साखर कारखान्यांनी केली आहे. साखर विक्री कोटा कमी असल्यामुळे साखरेचे भाव तेजीकडे आहेत. या सप्ताहात एम प्रतीचे साखरेचे भाव प्रतीक्विंटल ३३०० ते ३३५०, एस प्रतीच्या ३१५० ते ३२७५ व सुपर एसचे भाव ३२२५ ते ३३०० निघाले आहेत.

Web Title: The sharp rise in the price of sugar, the increase in demand due to the festival, the decline in sugarcane production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.