Real-Money Gaming : 'शार्क टँक इंडिया' या लोकप्रिय कार्यक्रमातील परीक्षक आणि प्रसिद्ध उद्योजक अनुपम मित्तल यांनी ऑनलाइन 'रियल-मनी' गेमिंगवरील बंदीच्या सरकारी धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाला त्यांनी 'मोरल पोलिसिंग' असे संबोधले असून, यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे कर महसूल बुडेल आणि वापरकर्ते काळ्या बाजारपेठांकडे वळतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आर्थिक नुकसानीचा धोका
आपल्या लिंक्डइन पोस्टमध्ये मित्तल यांनी या बंदीवर सडकून टीका केली आहे. "आपण गुटख्यावर बंदी घातली, पण लोकांनी तो खाणे थांबवले का?" असा सवाल विचारत त्यांनी या उद्योगातून मिळणाऱ्या प्रचंड महसूलाचा मुद्दा मांडला. त्यांच्या दाव्यानुसार, हा उद्योग सरकारला दरवर्षी २७,००० कोटींचा जीएसटी आणि १०,००० कोटींचा जाहिरात महसूल मिळवून देतो. तसेच, 'कौशल्यांवर आधारित' खेळांमधून हजारो लोकांना कायदेशीर रोजगार मिळतो.
व्यसन आणि आर्थिक नुकसान ही खरी समस्या असली, तरी पूर्ण बंदी घालणे हे त्याचे उत्तर नाही, असे त्यांचे ठाम मत आहे. मित्तल यांनी सरकारला विचारले, "काही लोक व्यसनी होतात म्हणून आपण दारूवर बंदी घालतो का? काही लोक आपली बचत घालवतात म्हणून आपण शेअर बाजारातील ट्रेडिंगवर बंदी घालतो का?"
बंदीमुळे काळ्या बाजाराला फायदा
मित्तल यांच्या मते, अशा प्रकारच्या बंदीचे परिणाम नेहमीच उलट होतात. यामुळे "सरकारचा महसूल बुडतो, वापरकर्त्यांचे संरक्षण कमी होते आणि काळ्या बाजारपेठांना फायदा होतो." अवैध गेमिंग बाजाराचे सध्याचे मूल्य ८.३ लाख कोटी रुपये असल्याचा त्यांनी दावा केला.
त्यांनी म्हटले की, 'कमी कालावधीत' असे धोरण म्हणजे "स्वतःच्या पायावर गोळी मारून घेतल्यासारखे" वाटत आहे. भविष्यात ई-स्पोर्ट्स आणि कौशल्य-आधारित प्लॅटफॉर्मना फायदा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र, या कडक कारवाईमागे नक्की कोणता उद्देश आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "सरळ सांगायचे तर, हे धोरण नसून नैतिक पोलिसगिरीसारखे दिसत आहे," असे थेट मत त्यांनी मांडले.
आपल्या पोस्टच्या शेवटी, त्यांनी सरकारच्या भूमिकेवर उपरोधिक टीका करत म्हटले की, "आशा आहे की आपण चीनपेक्षा जास्त बंदी घालण्याचा प्रयत्न करत नाही आहोत."
वाचा - कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
एक सातवी इयत्तेतील मुलगी आमच्या प्ले स्कूलला १५ दिवस इंटर्नशीपसाठी आली होती. तिने मुलांना व्यवस्थित सांभाळले. काही बाबतीत तिच्यात सुधारणादेखील हवी आहे. आता तिला तिच्या शाळेत दाखवण्यासाठी एक सर्टिफिकेट द्यायचं आहे. ते कसं असावं? त्यात काय मजकूर असावा? याविषयी माहिती द्या.