Lokmat Money > बिझनेस न्यूज > PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

वाचा आणखी कोणत्या शेअर्समध्ये आहे तेजीची शक्यता. काय म्हटलंय ब्रोकरेजनं...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 04:34 PM2024-05-21T16:34:13+5:302024-05-21T16:36:12+5:30

वाचा आणखी कोणत्या शेअर्समध्ये आहे तेजीची शक्यता. काय म्हटलंय ब्रोकरेजनं...

Shares of government companies rise after PM narendra Modi s statement brokerage bullish on Coal India airtel icici coal india share buy rating | PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

Closing Bell Today: लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजाराचं एकूण मार्केट कॅप ५ लाख कोटी डॉलर्सवर पोहोचलं आहे. चालू आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. कामकाजादरम्यान काही सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. दरम्यान, एक्सपर्ट आता काही शेअर्सवर बुलिश दिसून येत असून त्यांनी ते खरेदी करण्याचा सल्ला दिलाय.
 

मंगळवारी आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात थोडी घसरण दिसून आली. परंतु दुसरीकडे शेअर बाजाराचं मार्केट कॅप ५ ट्रिलियन डॉलर्सच्या वर गेलं आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ जूनच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर नंतर भारतीय शेअर बाजार नव्या शिखरावर जाईल, असा विश्वास व्यक्त केलाय.  
 

ब्रोकरेजनं काय म्हटलंय?
 

कोल इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि एअरटेलच्या शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश दिसत असून मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसनं हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. मंगळवारी कोल इंडियाच्या शेअरमध्ये ४.४६ टक्क्यांची वाढ होऊन शेअर ४९०.६५ रुपयांवर पोहोचला. तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये ०.८७ टक्क्यांची घसरण होऊन शेअर ११२०.९५ रुपयांवर आणि एअरटेलचा शेअर ०.२६ टक्क्यांच्या घसरणीसह १३४४.३० रुपयांवर पोहोचला.
 

भारती एअरटेल : मोतीलाल ओस्वालनं कंपनीच्या शेअरला बाय रेटिंग दिलं असून  १६४० रुपयांचं टार्गेट प्राईज दिलं आहे. दरम्यान, कंपनीला त्यांचा EBITDA ४० ते ५०% ने वाढवण्याची आणि पुढील २-३ वर्षांत निव्वळ कर्ज अर्ध्यावर आणण्याची संघी आहे. शेअरमध्ये होणारी वाढ, ग्राहकांच्या प्रीमियमायझेशन आणि टॅरिफ वाढीमुळे ARPU मध्ये होणारी वाढ, तसंच होम आणि एंटरप्राइझ सारख्या नॉन-वायरलेस सेगमेंट्सच्या परिणामी सेक्टर टेलविंड्सचा फायदा होऊ शकतो असं ब्रोकरेजनं म्हटलंय.
 

आयसीआयसीआय बँक : आयसीआयसीआय बँकेनं आणखी एका तिमाहीत स्थिर निकाल नोंदवला. दरम्यान, आयसीआयसीआय बँकेला ब्रोकरेजनं बाय रेटिंग दिलं आहे. तसंच या शेअरला त्यांनी १३०० रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे.
 

कोल इंडिया : कोल इंडियाच्या उपकंपन्यांमध्ये मजबूत उत्पादन आणि विक्रीत मोठी वाढ दिसून आली आहे. कंपनी वीज कंपन्यांना आपल्या बहुतांश उत्पादनांची विक्रीही करते. ऊर्जा क्षेत्राच्या वाढत्या कोळशाच्या मागणीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोलइंडियाने एफएसए करार आणि बीएलसीद्वारे लाँग टर्म कमिटेमेंट्स केल्या आहेत. मजबूत व्हॉल्यूम आउटलुक, हेल्थी इ ऑक्शन प्रीमिअम्स आणि कमी खर्च या बाबी कोल इंडियासाठी सकारात्मक आहेत.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Shares of government companies rise after PM narendra Modi s statement brokerage bullish on Coal India airtel icici coal india share buy rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.