Lokmat Money > बिझनेस न्यूज > १३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी किंवा खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:54 IST2025-06-07T15:54:28+5:302025-06-07T15:54:28+5:30

गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी किंवा खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

shares of adani enterprises company will be in focus on June 13th do you also have investments | १३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी किंवा खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील आठवड्यात अदानी एन्टरप्राईजेससाठी फायनल डिविडेंड रेकॉर्ड डेट आहे.अदानी एंटरप्रायझेसनं गेल्या महिन्यात प्रति शेअर १.३ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला होता आणि त्यासाठी १३ जून २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली होती.

शेअर परफॉर्मन्स

शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर १.२४ टक्क्यांनी वधारून २,५३५ रुपयांवर पोहोचला. व्यवहारादरम्यान हा शेअर २५५३ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २०२६ रुपये आहे. तर ५२ आठवड्यांचा उच्चांक ३,३५१ रुपये आहे.

अदानी एंटरप्रायझेस तिमाही निकाल

अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या चौथ्या तिमाहीत ७.५ पटीनं वाढून ३,८४५ कोटी रुपये झाला आहे. मार्च २०२५ तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ३,८४५ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ४५०.५८ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

मात्र, अदानी विल्मरच्या शेअर्सच्या विक्रीतून एकरकमी नफा समायोजित केल्यानंतर अदानी एंटरप्रायझेसचा निव्वळ नफा १,३१३ कोटी रुपये झाला. विल्मरमधील हिस्सा विक्रीतून कंपनीला ३,२८६ कोटी रुपये मिळाले. संपूर्ण आर्थिक वर्षात (२०२४-२५) अदानी एंटरप्रायझेसचा निव्वळ नफा दुपटीने वाढून ७,०९९ कोटी रुपये झाला आहे, जो आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३,२४०.७८ कोटी रुपये होता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: shares of adani enterprises company will be in focus on June 13th do you also have investments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.