Share Market Update: मंगळवारी (११ नोव्हेंबर) अमेरिकेतील सकारात्मक बातम्या आणि देशांतर्गत निकालांच्या गतीमुळे भारतीय बाजाराची सुरुवात सुस्त झाली. कामकाजाच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी जवळजवळ स्थिर होते, निफ्टी २५,५८० च्या आसपास होता. तथापि, त्यानंतर बाजारात हळूहळू घसरण दिसून आली. सेन्सेक्स २५० अंकांनी घसरला आणि तो ८३,२४७ च्या इंट्रा डे लो पर्यंत आला. निफ्टीनं २५,४८६ चा इंट्रा डे लो वर आला. बँक निफ्टी १५० अंकांनी घसरला.
सुरुवातीच्या वाढीनंतर, जवळजवळ सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एनबीएफसी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. फक्त आयटी निर्देशांक ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होता. कामकाजादरम्यान निफ्टीमध्ये मॅक्स हेल्थकेअर, टीसीएस, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डॉ. रेड्डीज लॅब्स हे प्रमुख वधारलेले शेअर्स होते, तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, श्रीराम फायनान्स, एशियन पेंट्स आणि एसबीआय या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
सेन्सेक्स १३६ अंकांनी वाढून ८३,६७१ वर उघडला. निफ्टी ४३ अंकांनी वाढून २५,६१७ वर उघडला. बँक निफ्टी २५ अंकांनी वाढून ५७,९६२ वर उघडला. चलन बाजारात, रुपया १ पैशानं घसरून ८८.७१/ डॉलर्सवर उघडला. अमेरिकेतील शटडाऊन संपण्याची आशा आणि ट्रम्प यांच्या विधानामुळे जागतिक भावना सुधारल्या आहेत. दरम्यान, सोने आणि चांदीच्या किमतीत झालेली तेजी आणि बेस मेटल्सच्या मजबूतीमुळे कमोडिटी बाजाराला चालना मिळाली आहे.
