Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

Share Market Today: जागतिक संकेतांदरम्यान सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह उघडले. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स २६१.२५ अंकांनी घसरून ८१,२०१.८४ वर व्यवहार करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 09:59 IST2025-07-28T09:59:29+5:302025-07-28T09:59:29+5:30

Share Market Today: जागतिक संकेतांदरम्यान सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह उघडले. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स २६१.२५ अंकांनी घसरून ८१,२०१.८४ वर व्यवहार करत होता.

Share Market Today Stock market starts with a decline Sensex falls by 260 points these stocks hit | Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

Share Market Today: जागतिक संकेतांदरम्यान सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह उघडले. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स २६१.२५ अंकांनी घसरून ८१,२०१.८४ वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी देखील ७०.४ अंकांच्या घसरणीसह २४,७६६.६० वर व्यवहार करताना दिसला. सोमवारच्या व्यवहारात निफ्टीवर संमिश्र कल दिसून आला. टाटा मोटर्स, सिप्ला, टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि बजाज फिनसर्व्ह सारख्या शेअर्सनं ताकद दाखवली आणि ते प्रमुख वाढणाऱ्या शेअर्सपैकी एक होते.

या मोठ्या स्टॉकमध्ये घसरण

दुसरीकडे, कोटक महिंद्रा बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, जिओ फायनान्शियल, बजाज फायनान्स, एचसीएल टेक आणि टायटन कंपनी यांसारखे हेवीवेट शेअर्स सर्वाधिक घसरले. जर आपण क्षेत्रांवर नजर टाकली तर, रिअल्टी निर्देशांक २ टक्क्यांनी, प्रायव्हेट बँक १ टक्क्यांनी, आयटी आणि बँक ०.५-०.५ टक्क्यांनी घसरले, तर ऑटो, ऑइल अँड गॅस, पीएसयू बँक ०.५-०.५ टक्क्यांनी वधारले.

या वृत्ताचा परिणाम

डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनसोबत १५% टॅरिफवर व्यापार करार करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच, अमेरिका आजपासून चीनसोबत टॅरिफबाबत वाटाघाटी सुरू करणार आहे. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लॅटनिक यांनी स्पष्ट केलंय की, १ ऑगस्टनंतर टॅरिफची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही आणि कोणत्याही सवलती दिल्या जाणार नाहीत. हे स्पष्ट आहे की अमेरिका चीनवर दबाव आणण्याच्या आपल्या रणनीतीवर ठाम आहे.

अमेरिकन बाजारात तेजी

शुक्रवारी अमेरिकन बाजारात जोरदार तेजी दिसून आली. मजबूत कॉर्पोरेट निकालांमुळे आणि टॅरिफ डीलच्या अपेक्षांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. एस अँड पी ५०० सलग पाचव्या दिवशी विक्रमी उच्चांकावर बंद झाला, तर नॅस्डॅकनं तिसऱ्या दिवशी नवीन आजवरचा उच्चांक गाठला. डाऊ जोन्स सुमारे २०० अंकांनी वधारला. सोमवारी डाऊ फ्युचर्समध्येही १७० अंकांची तेजी दिसून येत आहे. दरम्यान, जपानचा निक्केई निर्देशांक २५० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

Web Title: Share Market Today Stock market starts with a decline Sensex falls by 260 points these stocks hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.