Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Midcap मध्ये मोठी खरेदी; Dr Reddy's, Eternal, Shriram Finance टॉप गेनर्स

Share Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Midcap मध्ये मोठी खरेदी; Dr Reddy's, Eternal, Shriram Finance टॉप गेनर्स

देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारी ग्रीन झोनमध्ये झाली, मात्र तेथून बाजार पुन्हा घसरताना दिसला पण पुन्हा निर्देशांकात तेजी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 10:27 IST2025-06-05T10:27:53+5:302025-06-05T10:27:53+5:30

देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारी ग्रीन झोनमध्ये झाली, मात्र तेथून बाजार पुन्हा घसरताना दिसला पण पुन्हा निर्देशांकात तेजी दिसून आली.

share market today stock market starts in green zone big buying in midcap dr reddy s eternal shriram finance top gainers | Share Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Midcap मध्ये मोठी खरेदी; Dr Reddy's, Eternal, Shriram Finance टॉप गेनर्स

Share Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Midcap मध्ये मोठी खरेदी; Dr Reddy's, Eternal, Shriram Finance टॉप गेनर्स

देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारी ग्रीन झोनमध्ये झाली, मात्र तेथून बाजार पुन्हा घसरताना दिसला पण पुन्हा निर्देशांकात तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान सेन्सेक्स १९० अंकांनी वधारला. निफ्टी तब्बल ८० अंकांनी वधारला. बँक निफ्टी मात्र कमकुवत होता. मिडकॅप शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. फार्मा शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळत होती. निफ्टीवर डॉ. रेड्डी, सिप्ला, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, रिलायन्स या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा कन्झ्युमर, इंडसइंड बँक, नेस्ले यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

कालच्या बंदच्या तुलनेत सेन्सेक्स १९८ अंकांनी वधारून ८१,१९६ वर उघडला. निफ्टी ७१ अंकांनी वधारून २४,६९१ वर उघडला. बँक निफ्टी १३० अंकांनी वधारून ५५,८०६ वर उघडला. चलन बाजारात रुपया ३ पैशांनी मजबूत होऊन ८५.८७/डॉलरवर पोहोचला.

'भारतात या, एकत्र सेलिब्रेट करू,' RCB च्या विजयाच्या पोस्टनंतर स्टेट बँकेनं मल्ल्याची उडवली खिल्ली

सलग ३ दिवस विक्री केल्यानंतर एफआयआयने काल रोखीनं खरेदी केली होती. सलग बाराव्या दिवशी ६१६ कोटी रुपयांची रोख, निर्देशांक आणि शेअर फ्युचर्सची निव्वळ खरेदी कायम राहिली. गिफ्ट निफ्टी आज सकाळी २४,७४० च्या जवळ फ्लॅट होता. डाऊ फ्युचर्स सुस्त दिसत होते आणि निक्केई ५० अंकांनी घसरला.

बाजाराचे ट्रिगर कोणते?

याशिवाय मोठा ट्रिगर म्हणजे रिझर्व्ह बँकेचं पतधोरण. व्याजदरांबाबत उद्या आरबीआयचा निर्णय येईल. अनेक तज्ज्ञांनी २५ बेसिस पॉईंट कपातीची अपेक्षा व्यक्त केली आहे, तर आणखी काहींनी ५० बेसिस पॉईंट कपातीचा विश्वास व्यक्त केला. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारावर आज पुन्हा चर्चा सुरू होणार आहे. काल अमेरिकन बाजारात संमिश्र व्यवहार झाले. सलग ४ दिवसांच्या चढउतारानंतर डाऊ ९० अंकांनी घसरून दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला, तर नॅसडॅक सलग तिसऱ्या दिवशी ६० अंकांनी वधारला.

Web Title: share market today stock market starts in green zone big buying in midcap dr reddy s eternal shriram finance top gainers