Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी

Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी सपाट झाली आणि त्यानंतर लगेचच प्रमुख बेंचमार्क निर्देशांक वधारले. सेन्सेक्स २५० अंकांच्या वाढीसह ८१,६२३ च्या आसपास व्यवहार करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 09:59 IST2025-06-20T09:59:00+5:302025-06-20T09:59:00+5:30

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी सपाट झाली आणि त्यानंतर लगेचच प्रमुख बेंचमार्क निर्देशांक वधारले. सेन्सेक्स २५० अंकांच्या वाढीसह ८१,६२३ च्या आसपास व्यवहार करत होता.

Share market today first flat start Sensex jumps by 255 points strong buying in PSU banks iran israel stock exchange | Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी

Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी सपाट झाली आणि त्यानंतर लगेचच प्रमुख बेंचमार्क निर्देशांक वधारले. सेन्सेक्स २५० अंकांच्या वाढीसह ८१,६२३ च्या आसपास व्यवहार करत होता. तर निफ्टी ८० अंकांच्या वाढीसह २४,८७० च्या आसपास होता. तर निफ्टी बँक २३० अंकांच्या वाढीसह ५५,८०० च्या वर होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्यानंतर आज त्यात तेजी दिसून आली. निफ्टीवर पीएसयू बँक निर्देशांक सर्वाधिक वधारला.

इराण-इस्रायल हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं दोन आठवड्यांत इराणवर हल्ला करण्याचा इशारा दिलाय. यामुळे जागतिक बाजारात तणाव निर्माण झालाय. गिफ्ट निफ्टी सकाळी २४८०० च्या आसपास फ्लॅट होता. डाऊ फ्युचर्स १५० अंकांनी घसरला. निक्केई ७० अंकांनी घसरला. 

पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या

गुरुवारी अमेरिकन बाजार बंद होते. युद्धाच्या उद्रेकामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीनं पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर झेप घेतली. ब्रेंट क्रूड ३ टक्क्यांनी वधारून ७९ डॉलरवर पोहोचला असून सध्या तो किंचित घसरणीसह ७७ डॉलरच्या जवळ व्यवहार करत आहे. बाजारात नेस्ले आणि इंडसइंड बँकेसाठी सेन्सेक्सचा आज शेवटचा दिवस आहे. सोमवारपासून ट्रेंट आणि बीईएल सेन्सेक्समध्ये सामील होतील. २६ जून रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत नेस्ले बोनस शेअर्सचा विचार करणार आहे.

Web Title: Share market today first flat start Sensex jumps by 255 points strong buying in PSU banks iran israel stock exchange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.