Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market Today: ३ दिवसांनंतर शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १२१ अंकांनी वधारला, या स्टॉक्समध्ये तेजी

Share Market Today: ३ दिवसांनंतर शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १२१ अंकांनी वधारला, या स्टॉक्समध्ये तेजी

सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन झोनमध्ये खुले झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:11 IST2025-06-04T10:11:44+5:302025-06-04T10:11:44+5:30

सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन झोनमध्ये खुले झाले.

Share Market Today After 3 days the stock market started in the green zone Sensex rose by 121 points these stocks rose | Share Market Today: ३ दिवसांनंतर शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १२१ अंकांनी वधारला, या स्टॉक्समध्ये तेजी

Share Market Today: ३ दिवसांनंतर शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १२१ अंकांनी वधारला, या स्टॉक्समध्ये तेजी

सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन झोनमध्ये खुले झाले. सेन्सेक्स १७५.३१ अंकांनी वधारून ८०,९१२.८२ अंकांवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी ४७.२० अंकांच्या वाढीसह २४,५८९.७० अंकांवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्समध्ये एअरटेल, इटर्नल, टेक महिंद्रा, मारुती, इंडसइंड बँक आणि बजाज फिनसर्व्हमध्ये तेजी दिसून आली. त्याचबरोबर टायटन, टीसीएस, सन फार्मा आदी शेअर्समध्ये घसरण झाली.

मंगळवारी शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स ६३६.२४ अंकांनी घसरून ८०,७३७.५१ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७४.१० अंकांच्या घसरणीसह २४,५४२.५० अंकांवर बंद झाला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भांडवलाचा ओघ आणि जागतिक पातळीवरील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर चौफेर विक्रीमुळे बाजारात घसरण झाली होती.

अमेरिका-चीनचं भांडण भारताच्या उंबरठ्यापर्यंत; जपान-जर्मनीही त्रस्त, कंपन्यांना टाळं ठोकण्याची वेळ

अमेरिकन बाजाराचा परिणाम

अमेरिकन बाजारांनी सुरुवात मंदावल्यानंतर जबरदस्त सुधारणा दाखवली आणि चौथ्या दिवशीही ते तेजीसह बंद झाले. डाऊ जोन्सनं दुहेरी शतक म्हणजेच २०० पेक्षा जास्त अंकांची वाढ नोंदवली, तर नॅस्डॅक सुमारे १५० अंकांच्या वाढीसह बंद झाला. आज सकाळी आशियाई बाजारांवरही त्याचा परिणाम दिसून आला. गिफ्ट निफ्टी सुमारे ५० अंकांनी वाढून २४,७०० च्या वर व्यवहार करत आहे, तर जपानचा निक्केई निर्देशांक ३०० अंकांच्या वाढीसह मजबूत दिसत आहे. 

Web Title: Share Market Today After 3 days the stock market started in the green zone Sensex rose by 121 points these stocks rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.