जर शेअर मार्केटमध्ये हुशारीने गुंतवणूक केली तर कमी वेळेत चांगला नफा मिळू शकतो. ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबलीजने (Automotive Stampings And Assemblies) गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांचे नशीब बदलले आहे. या टाटा कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात 1755.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच वर्षभरापूर्वी ज्याने या कंपनीत गुंतवणूक केली असेल, आज त्याचे नशीब बदलले असेल.
एक वर्षापूर्वी, ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग आणि असेंबलीजच्या एका शेअरची किंमत केवळ 33.25 रुपये एवढी होती. मात्र आज याच्या एका शेअरची किंमत 617 रुपये एवढी झाली आहे. जर तेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराने 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याचे 18.55 लाख रुपये झाले असते.
कंपनीच्या शेअरची किंमत गेल्या 52 आठवड्यांमध्ये प्रति शेअर 923.85 रुपये या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. तर, शेअरची निचांकी पातळी प्रति शेअर 31 रुपये एढी होती. या मल्टी-बॅगर स्टॉकचे मार्केट कॅप 978.83 कोटी रुपये एवढे आहे. टाटाची ही कंपनी ऑटो मॉड्यूल्स, शीट मेटल तयार करते आणि पुरवठा करते.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)