Lokmat Money > बिझनेस न्यूज > अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?

अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?

सध्या अदानी पॉवरचा शेअर ६०८.९० रुपयांवर आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 17:58 IST2025-09-03T17:57:40+5:302025-09-03T17:58:36+5:30

सध्या अदानी पॉवरचा शेअर ६०८.९० रुपयांवर आहेत...

Share Market Stock market adani group company adani power stock may cross 645 rs brokerage firm incred has maintained an add rating Do you have it | अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?

अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?

अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी पॉवर लिमिटेडवर ब्रोकरेज बुलिश दिसत आहेत. खरे तर, ब्रोकरेज फर्म इन्क्रेडने या स्टॉकवर 'अ‍ॅड' रेटिंग कायम ठेवले आहे. याच बरोबर, ब्रोकरेजने या स्टॉकसाठी टार्गेट प्राइजदेखील निश्चित केली आहे. सध्या अदानी पॉवरचा शेअर ६०८.९० रुपयांवर आहेत.

शेअरचे टार्गेट प्राइज -
अदानी पॉवरच्या शेअरचे टार्गेट प्राइज 649 रुपये एवढे आहे. सप्टेंबर 2024 मध्ये हा शेअर 681.30 रुपयांपर्यंत पोहोचला होता. हा या शेअरचा 52 आवड्यांचा उच्चांकदेखील होता. याचा विचार करता नवी टार्गेट प्राइज 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा कमी आहे. नोव्हेबर 2024 मध्ये हा शेअर 430.85 रुपयांच्या नीचांकांवर होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक होता.

काय म्हणताय ब्रोकरेज? -
ब्रोकरेज इंक्रेडने त्यांच्या नोटमध्ये लिहिले आहे की, अदानी पॉवरने ३.२ GW च्या नव्या औष्णिक क्षमतेसाठी लेटर ऑफ अवॉर्ड (LoAs) मिळवले आहे. ज्यामध्ये बिहारमध्ये २.४ GW आणि मध्य प्रदेशमध्ये ०.८ GW यांचा समावेश आहे. कंपनीने धीरौली कोळसा खाणीतही काम सुरू केले आहे, यामुळे कंपनीची इंधन सुरक्षा आणि अंमलबजावणी क्षमता वाढेल, असे इनक्रेडचे म्हणणे आहे. 

इन्क्रेडच्या अंदाजानुसार, अदानी पॉवर आर्थिक वर्ष २५-२८ दरम्यान EBITDA मध्ये ११% चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर (CAGR) साध्य करू शकते. 
नुकतेच, लार्सन अँड टुब्रो (L&T) ला अदानी पॉवरकडून ६,४०० मेगावॅट एवढ्या संयुक्त क्षमतेचे आठ औष्णिक विद्यूत युनिट्स स्थापन करण्याची ऑर्डर मिळाली आहे. ब्रोकरेजने त्यांच्या नोटमध्ये या ऑर्डरचाही उल्लेख केला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Share Market Stock market adani group company adani power stock may cross 645 rs brokerage firm incred has maintained an add rating Do you have it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.