lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सलग सहाव्या दिवशी शेअर बाजाराची उसळी; बीएसई आणि निफ्टी तेजीसह बंद

सलग सहाव्या दिवशी शेअर बाजाराची उसळी; बीएसई आणि निफ्टी तेजीसह बंद

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १३३.१४ अंकांच्या वाढीसह ४७ हजार ७४६ अंकांवर तर निफ्टी ४९. ३५ अंकांच्या तेजीसह १३ हजार ९८१ अंकांवर बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 05:22 PM2020-12-30T17:22:12+5:302020-12-30T17:27:51+5:30

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १३३.१४ अंकांच्या वाढीसह ४७ हजार ७४६ अंकांवर तर निफ्टी ४९. ३५ अंकांच्या तेजीसह १३ हजार ९८१ अंकांवर बंद झाला.

share market sensex today closing at green mark for consecutive sixth day | सलग सहाव्या दिवशी शेअर बाजाराची उसळी; बीएसई आणि निफ्टी तेजीसह बंद

सलग सहाव्या दिवशी शेअर बाजाराची उसळी; बीएसई आणि निफ्टी तेजीसह बंद

Highlightsशेअर बाजाराचा निर्देशांक तेजीसह बंदसलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात वाढदेशांतर्गत वातावरण आणि जागतिक पातळीचा बाजारावर सकारात्मक परिणाम

मुंबई : देशांतर्गत सकारात्मक वातावरण आणि जागतिक पातळीवरील संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. देशातील दोन्ही निर्देशांक आज (बुधवार) तेजीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक ०.२८ टक्के म्हणजेच १३३.१४ अंकांच्या वाढीसह ४७ हजार ७४६ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ४९. ३५ अंकांच्या तेजीसह १३ हजार ९८१ अंकांवर बंद झाला.

गेल्या सहा दिवसांपासून शेअर बाजार तेजीत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. सन २०२० मध्ये झालेले नुकसान वर्षाखेरीस भरून येऊ शकते, असा कयास बांधला जात आहे. मात्र, आगामी काळात शेअर बाजारात काही चढ-उतार दिसून येऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ०१ जानेवारी २०२० रोजी शेअर बाजाराचा निर्देशांक ४१ हजार ३०६ अंकांवर बंद झाला होता. 

शेअर बाजारात आज दिवसभर अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासीम, श्री सिमेंट, बजाज फायनान्स आणि आयशर मोटर्स या कंपन्यांच्या समभागात तेजी दिसून आली. तर, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, सन फार्मा, एसबीआय आणि भारती एअरटेल या कंपन्यांचे समभाग कोसळल्याचे पाहायला मिळाले. 

सेक्टरनुसार आढावा घेतल्यास बँका, फार्मा यांसह अनेक सेक्टर्स वाढीसह बंद झाले. तर फायनान्स, सर्व्हिसेस, आयटी, मीडिया, ऑटो आणि मेटल सेक्टरमधील शेअर घसरल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी शेअर बाजार वाढीसह खुला झाला. सकाळच्या सत्रात शेअर बाजार ३८. ७२ अंक, तर निफ्टी ११.१० अंकांच्या वाढीसह खुला झाला होता.  

Web Title: share market sensex today closing at green mark for consecutive sixth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.