lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > याला म्हणतात धमाका शेअर! 10 महिन्यांपासून देतोय बम्पर परतावा, 14 वर्षांचा विक्रम तुटणार 

याला म्हणतात धमाका शेअर! 10 महिन्यांपासून देतोय बम्पर परतावा, 14 वर्षांचा विक्रम तुटणार 

जर हा शेअर आपल्या टार्गेट प्राइसपपर्यंत पोहोचला तर, तो 14 वर्षांतील उच्चांक असेल. एप्रिल 2010 मध्ये शेअरने ही पातळी गाठली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 05:01 PM2024-04-25T17:01:12+5:302024-04-25T17:02:46+5:30

जर हा शेअर आपल्या टार्गेट प्राइसपपर्यंत पोहोचला तर, तो 14 वर्षांतील उच्चांक असेल. एप्रिल 2010 मध्ये शेअरने ही पातळी गाठली होती.

Share market nmdc stock may go up to 297 rupees expert says buy break record near | याला म्हणतात धमाका शेअर! 10 महिन्यांपासून देतोय बम्पर परतावा, 14 वर्षांचा विक्रम तुटणार 

याला म्हणतात धमाका शेअर! 10 महिन्यांपासून देतोय बम्पर परतावा, 14 वर्षांचा विक्रम तुटणार 

नॅशनल मिनरल डेव्हलपमेन्ट कॉरपोरेशन लिमिटेडच्या शेअर संदर्भात एक्सपर्ट बुलिश आहेत. ब्रोकरेज फर्म एलकेपी सिक्योरिटीजने या शेअरवर नवे टार्गेट प्राइस देखील दिले आहे. महत्वाचे म्हणजे, NMDC च्या शेअरने 10 महिन्यांत 140 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. आता येणाऱ्या काळात आणखी तेजीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ब्रोकरेजचे टार्गेट प्राइस -
एलकेपी सिक्योरिटीजने NMDC वर 'खरेदी' रेटिंगसह कव्हरेज सुरू केले आहे. तसेच ₹297 चे टार्गेट प्राइस दिले आहे. अर्थात हा शेअर शॉर्ट टर्ममध्ये 297 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 252 रुपये एवढा आहे. यानुसार हा शेअर 18% पर्यंत वाढू शकतो. जर हा शेअर आपल्या टार्गेट प्राइसपपर्यंत पोहोचला तर, तो 14 वर्षांतील उच्चांक असेल. एप्रिल 2010 मध्ये शेअरने ही पातळी गाठली होती.

कंपनी संदर्भात थोडक्यात -
केंद्र सरकारच्या पोलाद मंत्रालयांतर्गत कार्यरत, NMDC ही 'नवरत्न' कंपनी आहे. ही देशातील सर्वात मोठी लोहखनिज उत्पादक आहे. कंपनी छत्तीसगड आणि कर्नाटकमध्ये लोह खनिज खाणी चालवते. लोहखनिजा व्यतिरिक्त, NMDC ही मध्य प्रदेशातील पन्ना येथील माझगवा खाणीतून हिऱ्यांचे उत्पादनही करते. कंपनी सध्या दरवर्षी सुमारे 45 मेट्रिक टन लोहखनिजाचे उत्पादन करते आणि त्याची उत्पादन क्षमता 51 मेट्रिक टन एवढी आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share market nmdc stock may go up to 297 rupees expert says buy break record near

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.