lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Multibagger Stock : फक्त 27 पैशांच्या शेअरची धमाल, 34 हजार रुपयांची गुंतवणूक करून लोक बनले मालामाल!

Multibagger Stock : फक्त 27 पैशांच्या शेअरची धमाल, 34 हजार रुपयांची गुंतवणूक करून लोक बनले मालामाल!

ज्या लोकांनी या शेअरमध्ये 34,000 रुपयांची गुंतवणूक केली होती, ते आता कोट्यधीश झाले आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 05:32 PM2022-11-17T17:32:10+5:302022-11-17T17:32:39+5:30

ज्या लोकांनी या शेअरमध्ये 34,000 रुपयांची गुंतवणूक केली होती, ते आता कोट्यधीश झाले आहेत...

Share Market multibagger stock jm financial 34 thousand investment turns 1 crore know about latest price | Multibagger Stock : फक्त 27 पैशांच्या शेअरची धमाल, 34 हजार रुपयांची गुंतवणूक करून लोक बनले मालामाल!

Multibagger Stock : फक्त 27 पैशांच्या शेअरची धमाल, 34 हजार रुपयांची गुंतवणूक करून लोक बनले मालामाल!


शेअर बाजारातीलगुंतवणूक ही जोखिमाधीन असते, असे म्हटले जाते. हे खरेही आहे. कारण शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार होत असतो. मात्र, काही गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजार हा नशिबाचा खजिनाही ठरू शकतो. कोणता शेअर केव्हा आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करून जाईल हे सांगता येत नाही. असेच काहीसे, जेएम फायनान्शिअलच्या (JM Financial) शेअर संदर्भात दिसून आले आहे. कारण यात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आज कोट्यधीश बनले आहेत.

किती आहे कंपनीचे मार्केट कॅप -
मुंबई बेस्ड जेएम फायनान्शिअल एक फायनान्शियल सर्व्हिस ग्रुप आहे. याची स्थापना 1973 मध्ये करण्यात आली. हिची ब्रांच भारतासह सिंगापूर, न्यू जर्सी आणि दुबईमध्येही आहे. दोन दशकांपूर्वी नोव्हेंबर 2002 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत जवळपास 27 पैसे एवढी होती. मात्र आता हा शेअर 72 रुपयांवर ट्रेड करत आहे. मात्र, सध्या या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. मात्र, ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक केली आहे, त्यांच्यासाठी या शेअरने जबरदस्त परतावा दिला आहे.

दोन दशकांत गुंतवणूकदार मालामाल -
JM Financial च्या शेअर्सनी 20 वर्षांत गुंतवणूकदारांना 300 पटहून अधिकचा परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 2002 मध्ये, या शेअरमध्ये 34,000 रुपये गुंतवले होते. ते नोव्हेंबर 2022 पर्यंत एक कोटीरुपयांचे मालक झाले असतील. शेअर बाजारात या कंपनीच्या शेअर्स परफारमन्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, हा शेअर गुरुवारी 1.45 टक्क्यांच्या घसरणीसह 71.40 रुपयांवर आला आहे. बाजारातील तज्ज्ञमंडळी, या शेअरमध्ये गुंतवणूक करणे, हा फायद्याचा सौदा ठरेल, तसेच यात तेजी येण्याची शक्यता असल्याचेही म्हणत आहेत.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share Market multibagger stock jm financial 34 thousand investment turns 1 crore know about latest price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.