Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली

Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली

Share Market Live Updates 7 August: ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्बचा परिणाम आता दिसून येत आहे. शेअर बाजारात आज जोरदार घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्सचे २८ शेअर्स रेड झोनमध्ये आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:15 IST2025-08-07T14:13:41+5:302025-08-07T14:15:26+5:30

Share Market Live Updates 7 August: ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्बचा परिणाम आता दिसून येत आहे. शेअर बाजारात आज जोरदार घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्सचे २८ शेअर्स रेड झोनमध्ये आहेत.

Share Market Live Updates 7 August Stock market collapses due to Trump tariff bomb Sensex falls below 80000 points | Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली

Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली

Share Market Live Updates 7 August: ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्बचा परिणाम आता दिसून येत आहे. शेअर बाजारात आज जोरदार घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्सचे २८ शेअर्स रेड झोनमध्ये आहेत. तर फक्त दोनच शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. ३० शेअर्सचा हा निर्देशांक ६८८ अंकांच्या घसरणीसह ७९८५५ वर व्यवहार करत होता. तर, एनएसईचा ५० शेअर्सचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी २१४ अंकांच्या घसरणीसह २४३५९ वर आला आहे.

सेन्सेक्स मे २०२५ नंतर पहिल्यांदाच ८०००० च्या खाली आला आहे. निफ्टी देखील १२ मे च्या २४,३७८.८५ च्या नीचांकी पातळीवरून खाली आला आहे. आज तो २४,३४४.१५ च्या दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स हे निफ्टीतील टॉप लुझर्स आहेत.

कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत

टॅरिफवर रिलायन्सनं काय म्हटलं?

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं त्यांच्या ताज्या अहवालात म्हटलंय की, जगात सुरू असलेल्या राजकीय तणाव आणि वाढत्या शुल्काचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः कच्चं तेल आणि रसायनांच्या व्यवसायात, पुरवठा आणि मागणीमध्ये व्यत्यय येऊ शकतो. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत वाढ झाली असली तरी कच्च्या तेलाची मागणी मजबूत राहील. परंतु शुल्क आणि तणावामुळे पुरवठा साखळीत समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे बाजारात चढ-उतार होऊ शकतात, असं कंपनीनं म्हटलंय.

चीनमधील मंदावलेली मागणी, आशियातील विमान वाहतूक क्षेत्राची वाढ, भू-राजकीय परिस्थिती आणि नवीन आर्थिक नियम आणि निर्बंध, या सर्वांवर लक्ष ठेवावे लागेल. येणाऱ्या काळात या सर्व गोष्टींचा व्यवसायावर मोठा परिणाम होऊ शकतो, असंही त्यांनी नमूद केलं.

Web Title: Share Market Live Updates 7 August Stock market collapses due to Trump tariff bomb Sensex falls below 80000 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.