Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market Dhanteras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी बाजार गडगडला; सोमवारच्या तेजीनंतर Sensex, Nifty मध्ये घसरण

Share Market Dhanteras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी बाजार गडगडला; सोमवारच्या तेजीनंतर Sensex, Nifty मध्ये घसरण

Share Market Dhanteras 2024 : देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात आज संमिश्र व्यवहारानं झाली. मात्र नंतर त्यात मोठी घसरण दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 10:03 IST2024-10-29T10:03:21+5:302024-10-29T10:03:21+5:30

Share Market Dhanteras 2024 : देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात आज संमिश्र व्यवहारानं झाली. मात्र नंतर त्यात मोठी घसरण दिसून आली.

Share Market Dhanteras 2024 The market rumbled on the day of diwali dhanteras Sensex Nifty fall after Monday s rally | Share Market Dhanteras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी बाजार गडगडला; सोमवारच्या तेजीनंतर Sensex, Nifty मध्ये घसरण

Share Market Dhanteras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी बाजार गडगडला; सोमवारच्या तेजीनंतर Sensex, Nifty मध्ये घसरण

Share Market Dhanteras 2024 : देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात आज संमिश्र व्यवहारानं झाली. आजच्या व्यवहारात सेन्सेक्सनं ८०,००० च्या वर ओपनिंग दाखवली. बँक निफ्टी ११० अंकांनी म्हणजेच ०.५९ टक्क्यांच्या वाढीसह ५१,३९९ च्या पातळीवर व्यवहार करत होता. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मात्र कामकाजाच्या सुरुवातीच्या मिनिटात घसरण पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या दुसऱ्या म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स ३२.१६ अंकांच्या वाढीसह ८०,०३७.२० अंकांवर उघडला, तर एनएसईनिफ्टी ५० केवळ ७७.७५ अंकांच्या वाढीसह २४,३२८.८५ अंकांवर उघडला.

आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ३० पैकी २० कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये, तर उर्वरित १० कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये उघडले. निफ्टी ५० च्या ३२ कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये आणि १४ कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये उघडले. तर ४ कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. सुरुवातीच्या किरकोळ तेजीनंतर शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. १० च्या सुमारास शेअर बाजार ४१०.२३ अंकांच्या घसरणीसह ७९,५९४.८१ वर व्यवहार करत होता.

एनटीपीसीच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ

मंगळवारी एनटीपीसीचे शेअर्स सर्वाधिक २.०१ टक्क्यांच्या वाढीसह उघडले. सन फार्मा १.०२ टक्के, अॅक्सिस बँक ०.७९ टक्के, टाटा मोटर्स ०.७१ टक्के, एशियन पेंट्स ०.६३ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील ०.६० टक्के, आयसीआयसीआय बँक ०.५७ टक्के, एचयूएल ०.५७ टक्के, एसबीआय ०.५६ टक्के, इंडसइंड बँक ०.५२ टक्के आणि अदानी पोर्ट्स ०.५२ टक्क्यांनी वधारले.

याशिवाय टाटा स्टील, टायटन, नेस्ले इंडिया, आयटीसी, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, एचसीएल टेक यांचे शेअर्सही तेजीसह उघडले. तर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स कोणताही बदल न करता उघडले.

इन्फोसिसमध्ये मोठी घसरण

दुसरीकडे इन्फोसिसचे शेअर्स सर्वाधिक १.०३ टक्क्यांच्या घसरणीसह उघडले. महिंद्रा अँड महिंद्रा ०.७६ टक्के, एचडीएफसी बँक ०.५३ टक्के, भारती एअरटेल ०.३५ टक्के, लार्सन अँड टुब्रो ०.३१ टक्के, टीसीएस ०.०७ टक्के, मारुती सुझुकी ०.०२ टक्के, पॉवरग्रिड ०.०२ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.०२ टक्के आणि बजाज फिनसर्व्ह ०.०१ टक्क्यांनी घसरले.

Web Title: Share Market Dhanteras 2024 The market rumbled on the day of diwali dhanteras Sensex Nifty fall after Monday s rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.