Share Market Closing 2 July, 2025: भारतीय शेअर बाजार आज(दि.२) लाल रंगात बंद झाला. बीएसई सेन्सेक्स २८७.६० अंकांनी (०.३४ टक्के) घसरुन ८३,४०९.६९ अंकांवर आला, तर एनएसईचा निफ्टी ५० देखील ८८.४० अंकांनी (०.३५%) घसरुन २५,४५३.४० अंकांवर बंद झाला. आज, प्रामुख्याने बँकिंग आणि वित्तीय शेअर्समध्ये घसरण दिसून आली. टाटा स्टीलच्या शेअर्समध्येही आज मोठी वाढ झाली.
बुधवारी सेन्सेक्सच्या ३० पैकी फक्त १४ कंपन्या वाढीसह हिरव्या रंगात बंद झाल्या, तर उर्वरित १६ कंपन्यांचे शेअर्स तोट्यासह लाल रंगात बंद झाले. त्याचप्रमाणे, निफ्टी ५० पैकी २२ कंपन्या वाढीसह हिरव्या रंगात बंद झाल्या, तर उर्वरित २८ कंपन्या तोट्यासह लाल रंगात बंद झाल्या. आज, सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक ३.७२ टक्के वाढीसह बंद झाले, तर बजाज फिनसर्व्हचे शेअर्स सर्वाधिक २.१० टक्के घसरणीसह बंद झाले.
वाढणारे शेअर्स
सेन्सेक्समधील उर्वरित कंपन्यांमध्ये, आज एशियन पेंट्सचे शेअर्स २.१५ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट १.६० टक्के, ट्रेंट १.४३ टक्के, मारुती सुझुकी १.३८ टक्के, सन फार्मा ०.७७ टक्के, टाटा मोटर्स ०.६५ टक्के, भारती एअरटेल ०.५३ टक्के, टेक महिंद्रा ०.४८ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.३८ टक्के, एनटीपीसी ०.३० टक्के, टायटन ०.१४ टक्के, अॅक्सिस बँक ०.१४ टक्के आणि इन्फोसिसचे शेअर्स ०.११ टक्के वाढीसह बंद झाले.
घसरणारे शेअर्स
दुसरीकडे, बुधवारी लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स १.८९ टक्के, बजाज फायनान्स १.४८ टक्के, एचडीएफसी बँक १.३० टक्के, बीईएल १.२३ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.९४ टक्के, पॉवरग्रीड ०.९४ टक्के, एसबीआय ०.८६ टक्के, रिलायन्स ०.६६ टक्के, आयटीसी ०.५५ टक्के, एटरनल ०.४८ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.३६ टक्के, अदानी पोर्ट्स ०.२८ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.२७ टक्के, एचसीएल टेक ०.१९ टक्के आणि टीसीएसचे शेअर्स ०.१८ टक्क्यांनी घसरले.
(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)