share market :शेअर बाजारात सुरुवात आणि शेवटचे काही मिनिटे फार महत्त्वाची असतात. त्यातही शेवटचा तास नेहमी सत्रासाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण ट्रेडिंग संपल्यानंतर जे व्यापारी आणि गुंतवणूकदार बाजारात राहतात त्यांना थेट दुसऱ्या दिवशीच संधी मिळते. मात्र, या कालावधीत जगभरातील शेअर बाजारात व्यवहार सुरुच असतात. बुधवारच्या व्यवहाराच्या शेवटच्या तासात असेच घडलं. निफ्टी त्याच्या वरच्या पातळीपासून १०० हून अधिक अंकांनी घसरला. तर शेवटच्या ३० मिनिटांत सेन्सेक्स जवळजवळ ५०० अंकांनी घसरला. कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक घसरण झाली? कुठल्या स्टॉक्सने रिकव्हरी केली.
भारतीय शेअर बाजार बुधवारी घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज ३२८ अंकांच्या घसरणीसह ७८,२५५ वर बंद झाला. बाजार बंद होताना, सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी ११ समभाग हिरव्या रंगात तर १९ समभाग लाल चिन्हात व्यवहार करत होते. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकनिफ्टी ४२ अंकांच्या घसरणीसह २३,६९६ वर बंद झाला. बाजार बंद होताना निफ्टीच्या ५० समभागांपैकी २५ समभाग हिरव्या रंगात तर २५ शेअर घरुन बंद झाले.
या शेअर्समध्ये वाढ
निफ्टी पॅक शेअर्समध्ये हिंदाल्कोमध्ये सर्वाधिक २.९० टक्के, आयटीसी हॉटेल्समध्ये २.८८ टक्के, ओएनजीसीमध्ये २.७४ टक्के, अपोलो हॉस्पिटलमध्ये २.४४ टक्के आणि बीपीसीएलमध्ये २.१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय एशियन पेंटमध्ये ३.४० टक्के, टायटनमध्ये २.९९ टक्के, नेस्ले इंडियामध्ये २.१७ टक्के, ब्रिटानियामध्ये १.९६ टक्के आणि टाटा कन्झ्युमरमध्ये १.८६ टक्के घसरण झाली आहे.
कोणत्या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण?
क्षेत्रीय इंडेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, निफ्टी रिॲल्टीमध्ये २.०२ टक्क्यांनी सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. याशिवाय निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स १.०६ टक्क्यांनी, निफ्टी एफएमसीजी १.५० टक्क्यांनी आणि निफ्टी ऑटो ०.०९ टक्क्यांनी घसरले. याशिवाय निफ्टी बँकेत ०.२७ टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये ०.१० टक्के, निफ्टी आयटीमध्ये ०.१२ टक्के, निफ्टी मीडियामध्ये १.७४ टक्के, निफ्टी मेटलमध्ये १.५६ टक्के, निफ्टी फार्मामध्ये ०.६८ टक्के, निफ्टी पीएसयू बँकेत १.०४ टक्के, निफ्टी पीएसयू १.०४ टक्के, निफ्टी खाजगी बँकेत ०.११ टक्के, निफ्टी हेल्थकेअर इंडेक्स ०.८२ टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅस १.४३ टक्के, निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअर १.८८ टक्के आणि निफ्टी मिडस्मॉल आयटी आणि टेलिकॉममध्ये १.३३ टक्क्यांनी वाढले.