Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्यासारखी कमाई! ५ वर्षांपूर्वीच्या गुंतवणुकीवर २१६% परतावा; RBI कडून गोल्ड बाँडचे 'रिडेम्प्शन' दर जाहीर

सोन्यासारखी कमाई! ५ वर्षांपूर्वीच्या गुंतवणुकीवर २१६% परतावा; RBI कडून गोल्ड बाँडचे 'रिडेम्प्शन' दर जाहीर

Sovereign Gold Bond Redemption: आरबीआयने एसजीबी २०२०-२१ सिरीज इलेव्हनची अकाली विमोचन किंमत १५,३७४ रुपये ठेवली आहे. २०२१ मध्ये ४,८६२ रुपयाला खरेदी केलेल्या या बाँडने अंदाजे २१६% परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 17:52 IST2026-02-08T17:12:18+5:302026-02-08T17:52:15+5:30

Sovereign Gold Bond Redemption: आरबीआयने एसजीबी २०२०-२१ सिरीज इलेव्हनची अकाली विमोचन किंमत १५,३७४ रुपये ठेवली आहे. २०२१ मध्ये ४,८६२ रुपयाला खरेदी केलेल्या या बाँडने अंदाजे २१६% परतावा दिला आहे.

SGB 2020-21 Series-XI Redemption Investors Get 216% Return as RBI Fixes Price at ₹15,374 | सोन्यासारखी कमाई! ५ वर्षांपूर्वीच्या गुंतवणुकीवर २१६% परतावा; RBI कडून गोल्ड बाँडचे 'रिडेम्प्शन' दर जाहीर

सोन्यासारखी कमाई! ५ वर्षांपूर्वीच्या गुंतवणुकीवर २१६% परतावा; RBI कडून गोल्ड बाँडचे 'रिडेम्प्शन' दर जाहीर

Sovereign Gold Bond : ज्या गुंतवणूकदारांनी ५ वर्षांपूर्वी सोन्यात गुंतवणूक केली होती, त्यांच्यासाठी आरबीआयने आनंदाची बातमी दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने SGB 2020-21 Series-XI या मालिकेसाठी मुदतपूर्व परतावा किंमत जाहीर केली असून, यात गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त नफा मिळाला आहे. २०२१ मध्ये ५ हजार रुपयांच्या आत खरेदी केलेल्या एका ग्रॅम सोन्याची किंमत आज १५ हजार रुपयांच्या पार गेली आहे.

नफ्याचे गणित
फेब्रुवारी २०२१ मध्ये जेव्हा ही मालिका प्रसिद्ध झाली होती, तेव्हा डिजिटल गुंतवणूकदारांसाठी सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ४,८६२ रुपये होता. आरबीआयने ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुदतपूर्व परताव्यासाठी आता १५,३७४ रुपये प्रति युनिट हा भाव निश्चित केला आहे.
थेट नफा : प्रति युनिट १०,५१० रुपये.
एकूण परतावा : सुमारे २१६% रुपये.
दर कसा ठरला? : इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने ४, ५ आणि ६ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर केलेल्या ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी किमतीनुसार हा दर निश्चित करण्यात आला आहे.

व्याजाचा दुहेरी फायदा
गोल्ड बाँडचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ सोन्याच्या किमती वाढण्याचा फायदा मिळत नाही, तर गुंतवणूकदारांना मूळ रकमेवर वार्षिक २.५% व्याज देखील मिळते. हे व्याज दर सहा महिन्यांनी गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केले जाते. त्यामुळे २१६% भांडवली नफ्याव्यतिरिक्त ५ वर्षांचे एकूण १२.५% व्याज हा गुंतवणूकदारांसाठी अतिरिक्त 'बोनस' ठरला आहे.

वाचा - पेटीएमनंतर आता 'फोनपे'ची बारी! एप्रिलमध्ये येणार धमाका आयपीओ; गुंतवणूकदारांची उत्सुकता शिगेला

५ वर्षांनंतर बाहेर पडण्याची संधी
सॉव्हरेन गोल्ड बाँडची मुदत ८ वर्षांची असते. मात्र, नियमानुसार ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना व्याजाच्या तारखेला या योजनेतून बाहेर पडण्याची मुभा असते. ज्यांना आता पैशांची गरज आहे किंवा ज्यांना आपला नफा पदरात पाडून घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

Web Title : सोना बरसा! 5 साल के सॉवरेन गोल्ड बॉन्ड निवेश पर 216% रिटर्न।

Web Summary : आरबीआई ने सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2020-21 सीरीज-XI के लिए समयपूर्व मोचन दर की घोषणा की, निवेशकों को 216% का भारी रिटर्न मिला। 2021 में ₹4,862/ग्राम पर खरीदा गया सोना अब ₹15,374/यूनिट, साथ ही 2.5% वार्षिक ब्याज देता है। निवेशक 5 साल बाद बाहर निकल सकते हैं।

Web Title : Gold Bonanza! 216% Return on 5-Year Sovereign Gold Bond Investment.

Web Summary : RBI announces early redemption rate for Sovereign Gold Bond 2020-21 Series-XI, offering investors a whopping 216% return. Gold, purchased at ₹4,862/gram in 2021, now yields ₹15,374/unit, plus 2.5% annual interest. Investors can exit after 5 years.