lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनेक कंपन्यांनी फेसबुकवरील जाहिराती काढून घेतल्या; ७ बिलियन डॉलरचा फटका

अनेक कंपन्यांनी फेसबुकवरील जाहिराती काढून घेतल्या; ७ बिलियन डॉलरचा फटका

या सोशल मीडिया कंपनीचे शेअर शुक्रवारी ८.३ टक्क्यांनी घटले. जाहिरात काढून घेणाऱ्या कंपन्यांचे असे म्हणणे आहे की, तिरस्कार आणि खोटी माहिती रोखण्यात फेसबुक अपयशी ठरले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:07 AM2020-06-28T00:07:47+5:302020-06-28T00:08:11+5:30

या सोशल मीडिया कंपनीचे शेअर शुक्रवारी ८.३ टक्क्यांनी घटले. जाहिरात काढून घेणाऱ्या कंपन्यांचे असे म्हणणे आहे की, तिरस्कार आणि खोटी माहिती रोखण्यात फेसबुक अपयशी ठरले आहे.

Several companies removed ads on Facebook; 7 billion hit | अनेक कंपन्यांनी फेसबुकवरील जाहिराती काढून घेतल्या; ७ बिलियन डॉलरचा फटका

अनेक कंपन्यांनी फेसबुकवरील जाहिराती काढून घेतल्या; ७ बिलियन डॉलरचा फटका

न्यूयॉर्क : फेसबुक नेटवर्कवरून काही कंपन्यांनी जाहिराती काढून घेतल्यामुळे मार्क झुकेरबर्ग यांना ७.२ बिलियन डॉलरचा फटका बसला आहे. या सोशल मीडिया कंपनीचे शेअर शुक्रवारी ८.३ टक्क्यांनी घटले. युनिलिव्हरसह अन्य काही ब्रँडनी फेसबुकवर बहिष्कार टाकल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. युनिलिव्हरने स्पष्ट केले आहे की, फेसबुकसोबत यावर्षी पैसा खर्च करणार नाही.

ब्लूमबर्ग बिलियन इंडेक्सनुसार, शेअरच्या किमती घसरल्याने फेसबुकचे बाजारमूल्य ५६ बिलियन डॉलरने घसरले आणि झुकेरबर्ग यांची एकूण संपत्ती ८२.३ बिलियन डॉलरच्या खाली गेली. यामुळे झुकेरबर्ग हे चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. व्हेरिजन कम्युनिकेशनपासून ते हर्शे कंपनी यांनी फेसबुकवरील जाहिराती थांबविल्या आहेत. या कंपन्यांचे असे म्हणणे आहे की, तिरस्कार आणि खोटी माहिती रोखण्यात फेसबुक अपयशी ठरले आहे. दरम्यान, कोकाकोला कंपनीने स्पष्ट केले आहे की, ३० दिवसांसाठी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील जाहिराती देणे थांबविण्यात आले आहे.

फेसबुकने घेतली दखल
फेसबुकने स्पष्ट केले आहे की, ट्रम्प यांच्यासह सर्व नेत्यांच्या न्यूज संबंधित पोस्टवर इशाऱ्याचा संकेत लावण्यात येईल. दरम्यान, यापूर्वी मार्क झुकेरबर्ग यांनी ट्रम्प यांच्या काही वादग्रस्त पोस्टविरुद्ध कारवाई करण्यास नकार दिला होता. त्यांचे असे म्हणणे होते की, लोकांना नेत्यांचे जसेच्या तसे विधाने ऐकण्याचा अधिकार आहे. मात्र, टिष्ट्वटरने अशा वक्तव्यांवर इशारा देणारे संकेत लावले होते. तथापि, आता ट्रम्प यांनी जर नियमांचे उल्लंघन केले तर फेसबुक त्याचा सामना करण्यासाठी तयार आहे. झुकेरबर्ग यांनी आपल्या फेसबुक पेजवर धोरणातील बदलांची घोषणा केली.

या सोशल मीडिया कंपनीचे शेअर शुक्रवारी ८.३ टक्क्यांनी घटले. जाहिरात काढून घेणाºया कंपन्यांचे असे म्हणणे आहे की, तिरस्कार आणि खोटी माहिती रोखण्यात फेसबुक अपयशी ठरले आहे. कंपन्यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर फेसबुकने आपल्या धोरणात बदल केला आहे.

Web Title: Several companies removed ads on Facebook; 7 billion hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.