Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजारात 'बुल्स'चे पुनरागमन! सेन्सेक्स ४८७ अंकांनी सुसाट; डिफेन्स शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल

बाजारात 'बुल्स'चे पुनरागमन! सेन्सेक्स ४८७ अंकांनी सुसाट; डिफेन्स शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Stock Market : बुधवारी, सेन्सेक्सच्या ३० पैकी फक्त २२ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित ८ कंपन्यांचे शेअर्स तोट्यासह लाल रंगात बंद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:01 IST2026-01-28T17:01:23+5:302026-01-28T17:01:23+5:30

Stock Market : बुधवारी, सेन्सेक्सच्या ३० पैकी फक्त २२ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित ८ कंपन्यांचे शेअर्स तोट्यासह लाल रंगात बंद झाले.

Sensex Rises 487 Points, Nifty Above 25,340; BEL Shares Soar Nearly 9% Today | बाजारात 'बुल्स'चे पुनरागमन! सेन्सेक्स ४८७ अंकांनी सुसाट; डिफेन्स शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल

बाजारात 'बुल्स'चे पुनरागमन! सेन्सेक्स ४८७ अंकांनी सुसाट; डिफेन्स शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Stock Market : भारतीय शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांनी खरेदीचा उत्साह दाखवला. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि देशांतर्गत गुंतवणुकीच्या जोरावर सेन्सेक्स ४८७.२० अंकांनी वधारून ८२,३४४.६८ वर बंद झाला. त्याचप्रमाणे, निफ्टी ५० निर्देशांकानेही १६७.३५ अंकांची भर घालत २५,३४२.७५ ची पातळी गाठली. मंगळवारी देखील बाजार तेजीसह बंद झाला होता, मात्र आजच्या वाढीने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक उंचावला आहे.

BEL चा 'धडाका', एशियन पेंट्सला 'झटका'
आजच्या व्यवहारात संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या शेअरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. BEL चा शेअर तब्बल ८.९० टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. दुसरीकडे, एशियन पेंट्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक **४.३४ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.

कोणाची चांदी, कोणाला फटका?
तेजीत राहिलेले प्रमुख शेअर्स
सेन्सेक्समधील ३० पैकी २२ कंपन्यांचे शेअर्स आज हिरव्या निशाणीत बंद झाले.

  • भारत इलेक्ट्रॉनिक्स : ८.९०%
  • एटरनल : ५.०९%
  • बजाज फायनान्स : २.२०%
  • पॉवरग्रिड : २.१०%
  • महिंद्रा अँड महिंद्रा : १.६०%
  • TCS : १.३१%
  • रिलायन्स इंडस्ट्रीज : १.१६%
  • स्टेट बँक : ०.९४%

घसरण झालेले प्रमुख शेअर्स
बाजारात तेजी असतानाही ८ कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.

  • एशियन पेंट्स: ४.३४%
  • मारुती सुझुकी : २.३९%
  • सन फार्मा : १.७८%
  • इन्फोसिस : १.०१%
  • भारती एअरटेल : ०.८५%

वाचा - मोबाईल नंबर अन् पत्ता बदलणं आता सोपं! आधार अ‍ॅपचे 'हे' नवीन फीचर्स पाहिलेत का?

बाजारातील सद्यस्थिती

आजच्या तेजीमुळे निफ्टीने २५,३०० चा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज टीसीएस आणि रिलायन्ससारख्या हेवीवेट शेअर्सनी बाजाराला सावरले. विशेष म्हणजे, कालच्या घसरणीनंतर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये आज १.६०% ची सुधारणा पाहायला मिळाली. बँकिंग क्षेत्रातही अ‍ॅक्सिस, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स किरकोळ वाढीसह बंद झाले.
 

Web Title : बाजार में बुल्स की वापसी; सेंसेक्स में उछाल, डिफेंस स्टॉक चमका!

Web Summary : भारतीय शेयर बाजार में तेजी, सेंसेक्स 487 अंक ऊपर। बीईएल का शेयर 8.90% बढ़ा, एशियन पेंट्स गिरा। निफ्टी 25,300 के पार, टीसीएस और रिलायंस का समर्थन।

Web Title : Bulls Return to Market; Sensex Soars; Defense Stock Shines!

Web Summary : Indian stocks surged, Sensex up 487 points, driven by global cues. BEL's stock soared 8.90%, while Asian Paints fell. Nifty crossed 25,300, supported by TCS and Reliance.