Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजारात शेवटच्या क्षणी 'बुल्स'ची एन्ट्री! सेन्सेक्स-निफ्टी वधारला, 'या' एका निर्णयाने बदलले चित्र

बाजारात शेवटच्या क्षणी 'बुल्स'ची एन्ट्री! सेन्सेक्स-निफ्टी वधारला, 'या' एका निर्णयाने बदलले चित्र

Stock Market Highlights : आज, व्यवहार सुरू झाल्यापासून बाजारात चढ-उतार दिसून येत होते. परंतु, बाजार बंद होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच जोरदार वाढ दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:27 IST2026-01-27T16:27:23+5:302026-01-27T16:27:23+5:30

Stock Market Highlights : आज, व्यवहार सुरू झाल्यापासून बाजारात चढ-उतार दिसून येत होते. परंतु, बाजार बंद होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच जोरदार वाढ दिसून आली.

Sensex Rises 320 Points as India-EU FTA News Sparks Late Buying Spree | बाजारात शेवटच्या क्षणी 'बुल्स'ची एन्ट्री! सेन्सेक्स-निफ्टी वधारला, 'या' एका निर्णयाने बदलले चित्र

बाजारात शेवटच्या क्षणी 'बुल्स'ची एन्ट्री! सेन्सेक्स-निफ्टी वधारला, 'या' एका निर्णयाने बदलले चित्र

Stock Market : दिवसभर चढ-उतार पाहिल्यानंतर, भारतीय शेअर बाजाराने व्यवहाराच्या शेवटच्या काही मिनिटांत जोरदार मुसंडी मारली. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या घोषणेमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी, सेन्सेक्स ३१९.७८ अंकांनी वधारून ८१,८५७.४८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ने १२६.७५ अंकांची झेप घेत २५,१७५.४० ची पातळी गाठली.

शेवटच्या १० मिनिटांचा थरार!
आज बाजार उघडल्यापासून सावध हालचाली पाहायला मिळत होत्या. मात्र, बंद होण्यापूर्वी अवघ्या काही मिनिटांत खरेदीचा जोर वाढला. एका वेळी सेन्सेक्सने ५१४ अंकांची उसळी घेत ८२,०८४.९२ चा टप्पाही गाठला होता. भारत-EU कराराचा सकारात्मक परिणाम बाजारावर स्पष्टपणे दिसून आला.

कोणाची चांदी, कोणाला फटका?
तेजीत राहिलेले शेअर्स

सेन्सेक्समधील ३० पैकी १७ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या निशाणीत बंद झाले. यात अदानी पोर्ट्सने ४.४७% सह आघाडी घेतली.

  • अदानी पोर्ट्स : ४.४७%
  • अ‍ॅक्सिस बँक : ४.३१%
  • टाटा स्टील : २.६४%
  • टेक महिंद्रा : २.५८%
  • स्टेट बँक : २.२८%
  • अल्ट्राटेक सिमेंट : १.९७%
  • HDFC बँक : १.१६%

घसरण झालेले शेअर्स
ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी महिंद्रा अँड महिंद्राला आज सर्वाधिक फटका बसला. भारत-EU करारामुळे युरोपियन लक्झरी गाड्या स्वस्त होण्याच्या भीतीने ऑटो शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.

  • महिंद्रा अँड महिंद्रा : ४.१९%
  • कोटक महिंद्रा बँक : ३.१४%
  • एशियन पेंट्स : २.८१%
  • मारुती सुझुकी : १.४८%
  • बजाज फायनान्स : १.३८%
  • रिलायन्स इंडस्ट्रीज : ०.०८%

वाचा - लॅम्बोर्गिनी स्वस्त होणार, पण टाटा-महिंद्राची धाकधूक वाढणार! भारत-EU चा सामान्यांवरही परिणाम होणार

क्षेत्रीय कामगिरी
आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्सनी आज बाजाराला सावरले. इन्फोसिस, टीसीएस (किरकोळ घसरण असूनही सावरले) आणि आयसीआयसीआय बँकेत खरेदी दिसून आली. मात्र, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑटो शेअर्समध्ये नफावसुली झाली.
 

Web Title : अंत में तेजी: भारत-यूरोपीय संघ सौदे से सेंसेक्स, निफ्टी में उछाल!

Web Summary : भारत-यूरोपीय संघ व्यापार सौदे की घोषणा के बाद सेंसेक्स और निफ्टी में तेजी आई। अडाणी पोर्ट्स लाभ में आगे रहा; ऑटो क्षेत्र की चिंताओं के कारण एमएंडएम पीछे रहा। आईटी और बैंकिंग शेयरों ने बाजार को सहारा दिया।

Web Title : Late surge: Bulls enter market! Sensex, Nifty rise on EU deal.

Web Summary : Late buying propelled Sensex and Nifty higher after the India-EU trade deal announcement. Adani Ports led gainers; M&M lagged due to auto sector concerns. IT and banking stocks supported the market.