Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > IT पडले पण एफएमसीजीने तारले! रेपो रेट स्थिर राहताच बाजारात तेजीची लाट, 'या' क्षेत्रात चांगली वाढ

IT पडले पण एफएमसीजीने तारले! रेपो रेट स्थिर राहताच बाजारात तेजीची लाट, 'या' क्षेत्रात चांगली वाढ

Sensex-Nifty Closes Green: सुरुवातीच्या घसरणीनंतर, बाजाराला आरबीआय धोरण स्थिरतेचा आधार मिळाला. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी तोट्यातून सावरले आणि ग्रीन झोनमध्ये बंद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:26 IST2026-02-06T16:26:18+5:302026-02-06T16:26:18+5:30

Sensex-Nifty Closes Green: सुरुवातीच्या घसरणीनंतर, बाजाराला आरबीआय धोरण स्थिरतेचा आधार मिळाला. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी तोट्यातून सावरले आणि ग्रीन झोनमध्ये बंद झाले.

Sensex Rises 266 Points on RBI's Policy Pause; Investors Gain ₹34,000 Crore | IT पडले पण एफएमसीजीने तारले! रेपो रेट स्थिर राहताच बाजारात तेजीची लाट, 'या' क्षेत्रात चांगली वाढ

IT पडले पण एफएमसीजीने तारले! रेपो रेट स्थिर राहताच बाजारात तेजीची लाट, 'या' क्षेत्रात चांगली वाढ

Sensex-Nifty Closes Green : भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरणात 'रेपो रेट' ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवल्याने शेअर बाजारात शुक्रवारी सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. सुरुवातीच्या सत्रात जागतिक संकेतांमुळे बाजार दबावाखाली होता. मात्र, आरबीआयने धोरणात्मक स्थिरता स्पष्ट केल्यावर गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला. दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी हिरव्या निशाण्यात बंद होत गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला.

गुंतवणूकदारांची ३४,१४४ कोटींची कमाई
आरबीआयच्या निर्णयामुळे बाजारातील अनिश्चितता संपली आणि त्याचा परिणाम थेट गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर झाला. काल (५ फेब्रुवारी) बीएसईवर सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४,६६,७०,६००.०१ कोटी रुपये होते, जे आज वाढून ४,६७,०४,७४४.११ कोटींवर पोहोचले. गुंतवणूकदारांच्या भांडवलात आज एकाच दिवशी ३४,१४४.१० कोटींची भर पडली.

प्रमुख निर्देशांकांची कामगिरी

  • सेन्सेक्स : २६६.४७ अंकांच्या (०.३२%) वाढीसह ८३,५८०.४० वर बंद.
  • निफ्टी ५० : ५०.९० अंकांच्या (०.२०%) उसळीसह २५,६९३.७० वर स्थिरावला.
  • क्षेत्रीय कामगिरी : निफ्टी FMCG इंडेक्स २% वाढीसह आघाडीवर राहिला, तर IT क्षेत्रात १% हून अधिक घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मात्र आजही नफेखोरीचा दबाव दिसून आला.

वाचा - महागाई भत्त्यात २ टक्क्यांची भरघोस वाढ? केंद्र सरकारच्या निर्णयाकडे ५० लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष

सेन्सेक्समधील १३ शेअर्स 'ग्रीन झोन'मध्ये

  • आजच्या व्यवहारात 'एफएमसीजी'च्या दिग्गज कंपन्यांनी बाजाराला सावरले.
  • तेजीतील शेअर्स : आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स.
  • घसरणीतील शेअर्स : टीसीएस, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स आणि एशियन पेंट्स.
     

Web Title : आईटी गिरा, एफएमसीजी ने संभाला; बाजार में उछाल।

Web Summary : आरबीआई की स्थिर रेपो दर से बाजार में तेजी आई। सेंसेक्स और निफ्टी हरे निशान पर बंद हुए, एफएमसीजी में लाभ हुआ। अनिश्चितता कम होने से निवेशकों ने ₹34,144 करोड़ कमाए। आईटी क्षेत्र में गिरावट आई।

Web Title : IT sector falls, FMCG saves the day as market surges.

Web Summary : RBI's stable repo rate boosted market sentiment. Sensex and Nifty closed green, driven by FMCG gains. Investors earned ₹34,144 crore as uncertainty reduced. IT sector faced a decline.