Stock Market :शेअर बाजारात सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी किंचित दिलासा मिळाला. सकाळच्या सत्रात बाजार लाल रंगात सुरू झाला असला तरी, कामकाजाच्या अखेरीस IT शेअर्सनी महत्त्वाची भूमिका बजावत बाजाराला हिरव्या रंगात बंद करण्यात यश मिळवले. मात्र, प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट स्तरावर बंद झाले.
IT शेअर्स आणि RBI धोरण
तज्ज्ञांनी सांगितले की, जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतामुळे आणि उद्या आरबीआयचे पतधोरण येणार असल्याने गुंतवणूकदार सावध होते. सकाळी कमी दरात खरेदी झाल्याने बाजारात चांगली तेजी दिसली. मात्र, रुपया डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी स्तरावर पोहोचल्यामुळे आणि परदेशी गुंतवणूकदारांनी सतत पैसे काढल्यामुळे तेजीवर ब्रेक लागला. आरबीआय व्याजदरात कपात करण्याची शक्यता नाही, अशी चर्चा बाजारात होती. यामुळे रुपयाला काही प्रमाणात आधार मिळाला आणि शेवटच्या तासात बाजार पुन्हा स्थिर झाला.
IT क्षेत्राला फायदा
आयटी कंपन्यांचे शेअर्स आज सर्वाधिक तेजीत होते. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदरात कपात करू शकते, हे यामागील एक प्रमुख कारण आहे. तसेच, रुपया कमकुवत झाल्याचा थेट फायदा आयटी कंपन्यांना होतो (निर्यात महसूल डॉलरमध्ये असल्याने), ज्यामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा या क्षेत्राकडे लक्ष वेधले आणि हे शेअर्स दिवसभर हिरव्या रंगात राहिले.
आजचे टॉप गेनर्स स्टॉक
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस : १.४८%
- बीईएल : १.२७%
- टेक महिंद्रा : १.२६%
- इन्फोसिस : ०.९३%
- एचसीएल टेक : ०.८९%
आजचे टॉप लूजर्स स्टॉक
- मारुती सुझुकी : ०.७१%
- इटरनल : ०.६९%
- कोटक बँक : ०.५३%
- टायटन कंपनी : ०.४४%
- एचडीएफसी बँक : ०.३९%
वाचा - रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
