Stock Market : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी दिवसभर मोठे चढ-उतार दिसून आले. सुरुवातीच्या तेजीनंतर बाजारात जोरदार नफावसुली झाली, पण अखेरच्या सत्रात प्रमुख निर्देशांक किंचित वाढीसह हिरव्या निशाणीवर बंद झाले. यात सेन्सेक्स १२.१६ अंकांच्या (०.०१%) किरकोळ वाढीसह ८४,४७८.६७ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी ५० केवळ ३.३६ अंकांच्या (०.०१%) वाढीसह २५,८७९.१५ च्या पातळीवर स्थिरावला.
दिवसाच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ८४,९१९.४३ चा उच्चांक गाठला होता, तर निफ्टीने २६,००० चा स्तर पार केला होता. मात्र, दिवसअखेरीस निर्देशांक जवळजवळ जिथे सुरू झाले होते, त्याच स्तरावर बंद झाले.
नफावसुलीमुळे बाजार 'फ्लॅट' बंद
"सकारात्मक जागतिक आणि देशांतर्गत संकेतांसह बाजार वर चढला होता, पण उच्च पातळीवर नफावसुलीने ही वाढ संपवली. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी शटडाउन संपवणाऱ्या तात्पुरत्या फंडिंग बिलावर स्वाक्षरी केल्याने जागतिक बाजारात सकारात्मकता होती." ऑक्टोबरमधील महागाई विक्रमी नीचांकी पातळीवर आल्यामुळे आरबीआयच्या व्याज दर कपातीची अपेक्षा बळावली, ज्यामुळे मेटल आणि रिॲल्टी शेअर्समध्ये खरेदी झाली.
मात्र, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची सततची विक्री आणि रुपयाची कमजोरी यामुळे बाजारात नफावसुली झाली. बिहार निवडणुकीच्या निकालापूर्वी असलेल्या सतर्कतेच्या वातावरणामुळे प्रमुख निर्देशांक फ्लॅट बंद झाले.
आजचे टॉप गेनर्स स्टॉक्स
| कंपनी | वाढ (%) | बंद किंमत (₹) |
| एशियन पेंट्स | ३.८१% | २,८७९.१० |
| ICICI बँक | १.९९% | १,३८५.९५ |
| पॉवर ग्रिड | १.१६% | २७०.१० |
| लार्सन ॲन्ड टूब्रो | १.१६% | ३,९९९.२० |
| बजाज फिनसर्व | ०.९०% | २,०५४.२५ |
आजचे टॉप लूजर्स स्टॉक्स
| कंपनी | घसरण (%) | बंद किंमत (₹) |
| इटरनल | ३.६३% | २९७.७० |
| टीएमसीवी | २.२६% | ३२०.२५ |
| एम ॲन्ड एम | १.४५% | ३,६९९.२० |
| ट्रेंट | १.१९% | ४,३२१.९५ |
| टाटा स्टील | १.१५% | १७६.६० |
