Share Market Closing 5th May, 2025: सोमवारी शेअर बाजार साध्या तेजीसह बंद झाला. आज बीएसई सेन्सेक्स २९४.८५ अंकांनी (०.३७%) वधारून ८०,७९६.८४ अंकांवर बंद झाला. तर एनएसईचा निफ्टी ५० निर्देशांक ११४.४५ अंकांनी (०.४७%) वधारून २४,४६१.१५ अंकांवर बंद झाला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स २५९.७५ अंकांनी वधारून ८०,५०१.९९ अंकांवर आणि निफ्टी १२.५ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४३४६.७० वर बंद झाला.
अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये मोठी वाढ
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सच्या ३० पैकी १९ कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये बंद झाले तर, उर्वरित सर्व ११ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये बंद झाले. त्याचप्रमाणे निफ्टी ५० च्या ५० पैकी ३८ कंपन्या तेजीसह ग्रीन झोनमध्ये बंद झाल्या तर उर्वरित १२ कंपन्या घसरणीसह रेड झोनमध्ये बंद झाल्या. सेन्सेक्समध्ये अदानी पोर्ट्सचे शेअर्स सर्वाधिक ६.३१ टक्क्यांनी वधारले, तर कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स सर्वाधिक ४.५० टक्क्यांनी घसरले.
बजाज फिनसर्व्ह, महिंद्राच्या शेअरमध्ये मोठी वाढ
बजाज फिनसर्व्ह ३.७३ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ३.११ टक्के, इटर्नल २.४५ टक्के, आयटीसी १.८७ टक्के, पॉवरग्रिड १.६८ टक्के, टाटा मोटर्स १.५० टक्के, एशियन पेंट्स १.१८ टक्के, एचयूएल ०.९८ टक्के, बजाज फायनान्स ०.७९ टक्के, भारती एअरटेल ०.७३ टक्के, एचडीएफसी बँक ०.६९ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.६४ टक्के, टाटा स्टील ०.६४ टक्के, मारुती सुझुकी ०.४४ टक्के, टाटा स्टील ०.३४ टक्क्यांनी वधारले.
स्टेट बँक, अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये घसरण
एसबीआय १.२६ टक्के, अॅक्सिस बँक ०.६४ टक्के, टायटन ०.६२ टक्के, इंडसइंड बँक ०.५० टक्के, आयसीआयसीआय बँक ०.२६ टक्के, एचसीएल टेक ०.२२ टक्के, नेस्ले इंडिया ०.१६ टक्के, टेक महिंद्रा ०.१० टक्के, इन्फोसिस ०.०८ टक्के आणि एनटीपीसी ०.०७ टक्क्यांनी घसरले.