Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रत्येक शेअरवर १२५ रुपयांचा नफा! 'या' फार्मा कंपनीचा IPO उघडणार नशीब? तपशील जाणून घ्या

प्रत्येक शेअरवर १२५ रुपयांचा नफा! 'या' फार्मा कंपनीचा IPO उघडणार नशीब? तपशील जाणून घ्या

Senores Pharmaceuticals : गेल्या काही वर्षात फार्मा सेक्टरमधील कंपन्यांनी चांगला परतावा दिला आहे. या सेक्टरमध्ये आणखी एका कंपनीची भर पडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:14 IST2024-12-19T15:14:53+5:302024-12-19T15:14:53+5:30

Senores Pharmaceuticals : गेल्या काही वर्षात फार्मा सेक्टरमधील कंपन्यांनी चांगला परतावा दिला आहे. या सेक्टरमध्ये आणखी एका कंपनीची भर पडणार आहे.

senores pharmaceuticals ipo opens tomorrow gmp surged to rs 125 check price band lot size and others details | प्रत्येक शेअरवर १२५ रुपयांचा नफा! 'या' फार्मा कंपनीचा IPO उघडणार नशीब? तपशील जाणून घ्या

प्रत्येक शेअरवर १२५ रुपयांचा नफा! 'या' फार्मा कंपनीचा IPO उघडणार नशीब? तपशील जाणून घ्या

Senores Pharmaceuticals : गेल्या वर्षभरात आयपीओमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे. १० पैकी जवळपास ७ आयपीओंनी सकारात्मक रिटर्न दिले आहेत. तुम्ही देखील IPO मध्ये पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी, अहमदाबादस्थित फार्मास्युटिकल कंपनी, सिनोरेस फार्मास्युटिकल्सचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) उघडणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार या IPO च्या शेअर्ससाठी मंगळवार, २४ डिसेंबरपर्यंत बोली लावू शकतील. आयपीओ उघडण्याआधीच, सिनोरेस आयपीओचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. ग्रे मार्केटमध्ये १२५ रुपयांच्या प्रीमियमवर शेअर्सचे व्यवहार होत आहेत. म्हणजेच ग्रे मार्केट या IPO मधून कमाई होणार असल्याचे दाखवत आहे.

सिनोरेस फार्मास्युटिकल्सचा IPO चा प्राइस बँड ३७२ ते ३९१ रुपये निश्चित करण्यात आला आहे. आयपीओच्या एका लॉटमध्ये ३८ शेअर्स आहेत. गुंतवणूकदार किमान ३८ इक्विटी शेअर्स किंवा त्या पटीत अर्ज करू शकतात. वरच्या किंमतीच्या बँडनुसार, किमान १४,८५८ रुपये गुंतवावे लागतील. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत, कंपनीने प्रतिजैविक आणि अँटी-फंगल उपचारांसारख्या प्रमुख उपचारात्मक क्षेत्रांमध्ये ५५ उत्पादने लाँच केली आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये, कंपनीने ३२.७१ कोटी रुपये निव्वळ नफा आणि २१७.३४ कोटी रुपये कमाई केली.

IPO तपशील
सिनोरेस फार्मास्युटिकल्स IPO मध्ये ५०० कोटी किमतीचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांद्वारे ऑफर-फॉर-सेल (OFS) द्वारे २१ लाख इक्विटी शेअर्सची विक्री होईल. प्राइस बँडच्या वरच्या स्तरावर ५८२.११ कोटी उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. अँकर बुकची बोली प्रक्रिया आजपासून म्हणजेच १९ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. IPO मधून मिळणारे पैसे कंपनीच्या उपकंपन्यांमधील गुंतवणूक, विशिष्ट कर्जाची परतफेड, खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करणे, अधिग्रहण आणि इतर धोरणात्मक उपक्रमांसाठी वापरला जाईल.

गुंतवणूकदारांसाठी आरक्षण
या IPO पैकी ७५% पात्र संस्थात्मक बोलीदारांसाठी (QIBs) राखीव आहेत. IPO च्या १५% गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) आणि १०% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर हे ऍक्विरस कॅपिटल, ॲम्बिट आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट आहेत, तर लिंक इनटाइम इंडिया हे रजिस्ट्रार आहेत. कंपनीचे शेअर्स ३० डिसेंबर रोजी BSE आणि NSE वर लिस्ट होतील.

(Disclaimer: IPO मध्ये केलेली गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. तुम्हाला यापैकी कोणत्याही मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Web Title: senores pharmaceuticals ipo opens tomorrow gmp surged to rs 125 check price band lot size and others details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.