lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI New Rules: एसबीआयने नियम बदलले; जाणून घ्या नाहीतर ट्रान्झेक्शन थांबणार

SBI New Rules: एसबीआयने नियम बदलले; जाणून घ्या नाहीतर ट्रान्झेक्शन थांबणार

SBI New Rules: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 06:14 PM2021-12-19T18:14:21+5:302021-12-19T18:14:44+5:30

SBI New Rules: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.

SBI changes rules ATM withdrawal and Yono App; Know otherwise the transaction will stop | SBI New Rules: एसबीआयने नियम बदलले; जाणून घ्या नाहीतर ट्रान्झेक्शन थांबणार

SBI New Rules: एसबीआयने नियम बदलले; जाणून घ्या नाहीतर ट्रान्झेक्शन थांबणार

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार स्टेट बँकेच्या योनो अॅपवर ग्राहक केवळ त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबर असलेल्या स्मार्टफोनमधूनच लॉग ईन करू शकणार आहेत. या नियमानुसार तुम्ही अन्य कोणत्याही मोबाईलमध्ये योनोद्वारे लॉग इन करू शकणार नाही. ऑनलाईन बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी स्टेट बँकेने हे पाऊल उचलले आहे. 

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढल्याने एसबीआयने त्यांच्या योनो अॅपमध्ये हे बदल केले आहेत. यामुळे ग्राहकांचे व्यवहार आधीपेक्षा जास्त सुरक्षित होणार आहेत. तसेच ग्राहक ऑनलाईन फ्रॉडपासूनही वाचणार आहेत. 

ग्राहकांनी नवीन रजिस्ट्रेशनसाठी ज्या स्मार्टफोनमध्ये एसबीआय अकांउंटला जोडलेला मोबाईल नंबर असेल त्याच स्मार्टफोनचा वापर करावा, असा सल्ला एसबीआयने दिला आहे. योनो अॅपमधील बदलानुसार तुम्ही कोणत्याही फोनद्वारे लॉग इन करू शकणार नाही आहात. या आधी ग्राहक कोणत्याही फोनमधून लॉगइन करू शकत होते. 

एटीएमचा नियमही बदलला
योनो अॅपबरोबरच बँकेने एटीएमशी संबंधित नियमही बदलला आहे. जेव्हा कधी तुम्ही एटीएममध्ये 10000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सोबत ठेवावा लागणार आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो तुम्हाला एटीएम मशीनमध्ये पिन टाकल्यानंतर टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही पैसे काढू शकणार आहात. 9999 रुपयांपेक्षा कमी रक्कम काढणार असाल तर त्यासाठी ओटीपीची गरज नाही. ही सुविधा रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत आणि एसबीआयच्याच एटीएम सेंटरमध्ये उपलब्ध आहे. अन्य बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये ती काम करणार नाही.

Web Title: SBI changes rules ATM withdrawal and Yono App; Know otherwise the transaction will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.