Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...

'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...

Microsoft Lay Off : मायक्रोसॉफ्टमध्ये ९००० कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर अखेर कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांनी मौन सोडले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:32 IST2025-07-25T17:18:55+5:302025-07-25T17:32:19+5:30

Microsoft Lay Off : मायक्रोसॉफ्टमध्ये ९००० कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर अखेर कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांनी मौन सोडले आहे.

Satya Nadella Breaks Silence on Microsoft Layoffs What It Means for Employees and AI Future | 'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...

'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...

Microsoft Lay Off : गेल्या काही काळापासून अनेक आघाडीच्या टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली. यामध्ये सर्वात मोठं नाव बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्टचे होते. या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीने ९००० हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. धक्कादायक म्हणजे यावर कंपनीकडून कोणतीही भूमिका किंवा वक्तव्य करण्यात आलं नाही. या प्रश्नावर सीईओ सत्या नाडेला यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. कर्मचाऱ्यांना काढताना कंपनीकडून कोणताही सामूहिक अंतर्गत मेल पाठवण्यात आला नव्हता. द व्हर्जच्या बातमीनुसार, नाडेला यांनी आता याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशातील महत्त्वाचे मुद्दे
नाडेला यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, "मी अशा एका विषयाबद्दल बोलू इच्छितो, जे माझ्या मनावर ओझं आहे आणि ज्याबद्दल तुम्ही सर्वजण चिंतेत आहात. अलीकडेच कर्मचारी कपात मोहित संपुष्टात आली आहे. हा निर्णय आमच्यासाठी सर्वात कठीण होता. ज्यांच्यासोबत आम्ही काम केलं, शिकलो आणि अनेक संस्मरणीय क्षण शेअर केले आहेत, आमचे सहकारी, संघातील सहकारी आणि मित्र अशा लोकांवर त्यांचा परिणाम होतो."

आणखी कर्मचारी कपात होणार का?
बातमीनुसार, नाडेला यांनी त्यांच्या संदेशात स्पष्टपणे सांगितले नाही की, कर्मचारी कपातीची मालिका इथेच थांबेल. त्यांनी असे म्हटले की, या कपात असूनही मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांची एकूण संख्या "जवळजवळ अपरिवर्तित" आहे. ते म्हणाले की, "प्रत्येक वस्तुनिष्ठ मानकांनुसार, मायक्रोसॉफ्ट प्रगती करत आहे. आमची बाजारपेठेतील कामगिरी, धोरणात्मक स्थिती आणि वाढ या सर्व गोष्टी वाढत आहेत. आम्ही भांडवली खर्चात पूर्वीपेक्षा जास्त गुंतवणूक करत आहोत. तरीही, आम्हाला टाळेबंदीचा सामना करावा लागत आहे."

नाडेला यांनी मेमोमध्ये कंपनीच्या तीन प्रमुख प्राधान्यक्रमांवर चर्चा केली

  1. सुरक्षा : अलीकडील सायबर हल्ल्यांनंतर आणि सुरक्षेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांनंतर सुरक्षेला प्रथम क्रमांकाचे प्राधान्य देण्यात आले आहे. ते म्हणाले की, सुरक्षितता आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करता येणार नाही.
  2. गुणवत्ता : आपल्या पायाभूत सुविधा आणि सेवा जगासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.
  3. एआय परिवर्तन : एआय क्षेत्रात कंपनीची वाढती गुंतवणूक आणि महत्त्वाकांक्षा यावर त्यांनी भर दिला.

वाचा - तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले

एआय वाढ आणि विक्रमी नफा
मायक्रोसॉफ्टने २०२५ मध्ये किमान ९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यापैकी २००० कर्मचाऱ्यांना खराब कामगिरीमुळे काढण्यात आले आहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांना एआयशी संबंधित पुनर्रचनेमुळे काढावे लागले. दरम्यान, मायक्रोसॉफ्टच्या शेअरने पहिल्यांदाच ५०० अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या तीन तिमाहीत कंपनीचे निव्वळ उत्पन्न ७५ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. कंपनीने एआय पायाभूत सुविधांमध्ये ८० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. ती ३० जुलै रोजी तिचे Q4 FY25 चे निकाल जाहीर करणार आहे.

Web Title: Satya Nadella Breaks Silence on Microsoft Layoffs What It Means for Employees and AI Future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.