Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...

इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...

Russian Oil India: सरकारी कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने यापुढेही रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:04 IST2025-08-19T13:03:17+5:302025-08-19T13:04:25+5:30

Russian Oil India: सरकारी कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने यापुढेही रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Russian Oil India: Indian Oil slams America, will continue to buy crude oil from Russia | इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...

इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...

Indian Oil:रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५% शुल्क लादले आहे. याशिवाय, त्यांनी काही भारतीय तेल कंपन्यांवर निर्बंधही लादले आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या कारवाईला न जुमानता सरकारी कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने सोमवारी सांगितले की, ते यापुढेही रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे चालू ठेवतील. 

भारताला अमेरिकेच्या टॅरिफचा धोका असताना कंपनीने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटले की, रशियन बॅरलवरील सवलत लक्षणीयरीत्या कमी होऊन केवळ $1.5-2 प्रति बॅरल झाली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, 2026 च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रशियन तेलाचा वाटा IOCL च्या आयातीपैकी 24 टक्के होता, तर 2025 मध्ये 22 टक्के होता. या तिमाहीत कंपनी आर्थिक परिस्थितीनुसार रशियन तेल खरेदी करेल.

कंपनी शुद्धीकरण क्षमता वाढवत आहे
आर्थिक वर्ष २६ मध्ये इंडियन ऑइलने त्यांच्या व्यवसायावर ३४,००० कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली आहे. त्यापैकी १४,०००-१५,००० कोटी रुपये रिफायनरी ऑपरेशन्सवर आणि १५,०००-१६,००० कोटी रुपये पेट्रोकेमिकल्स, मार्केटिंग, पाइपलाइन आणि शहरांमध्ये गॅस वितरणावर खर्च केले जातील. कंपनी अनेक प्रकल्पांद्वारे त्यांची शुद्धीकरण क्षमताही वाढवत आहे.

पानिपतमधील त्यांच्या रिफायनरीची व्याप्ती देखील वाढवली जात आहे, जी १५ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष (MMTPA) वरून २५ दशलक्ष मेट्रिक टन पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न आहे. वर्षाच्या अखेरीस ती कार्यरत होण्याची अपेक्षा आहे. तर, बिहारमधील बरौनी रिफायनरीची व्याप्तीदेखील वाढवली जाईल. त्याची क्षमता ६ MMTPA वरून ९ MMTPA पर्यंत केली जाईल. यासोबतच, गुजरातमधील कोयाली रिफायनरी देखील १३.७ एमएमटीपीए वरून १८ एमएमटीपीए पर्यंत वाढवली जाईल.

ट्रम्प यांचा भारताला इशारा
या महिन्याच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले होते की, भारत केवळ मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करत नाही, तर खरेदी केलेले बहुतेक तेल खुल्या बाजारात मोठ्या नफ्यावर विकत आहे. युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यात किती लोक मरत आहेत, याची त्यांना पर्वा नाही. यासोबतच ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यावर अतिरिक्त २५ टक्के कर लादण्याची धमकीही दिली. जर ट्रम्पने खरोखरच भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला तर भारतावरील एकूण कर ५० टक्क्यांपर्यंत वाढेल.

Web Title: Russian Oil India: Indian Oil slams America, will continue to buy crude oil from Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.