Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इराण तणावादरम्यान रशियानं कच्च्या तेलाचा खजिनाच उघडला; भारत आणि चीनसाठी केली मोठी घोषणा

इराण तणावादरम्यान रशियानं कच्च्या तेलाचा खजिनाच उघडला; भारत आणि चीनसाठी केली मोठी घोषणा

Iran Israel America War Crude Oil: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या बाजारात खळबळ उडाली आहे. होर्मुजबाबत अनिश्चितता वाढली असतानाच रशियानं मोठी खेळी खेळली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 09:46 IST2026-03-05T09:45:38+5:302026-03-05T09:46:52+5:30

Iran Israel America War Crude Oil: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या बाजारात खळबळ उडाली आहे. होर्मुजबाबत अनिश्चितता वाढली असतानाच रशियानं मोठी खेळी खेळली आहे.

Russia opens its crude oil treasury amid Iran israel america war makes big announcement for India and China | इराण तणावादरम्यान रशियानं कच्च्या तेलाचा खजिनाच उघडला; भारत आणि चीनसाठी केली मोठी घोषणा

इराण तणावादरम्यान रशियानं कच्च्या तेलाचा खजिनाच उघडला; भारत आणि चीनसाठी केली मोठी घोषणा

Iran Israel America War Crude Oil: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या बाजारात खळबळ उडाली आहे. होर्मुजबाबत (Strait of Hormuz) अनिश्चितता वाढली असतानाच रशियानं मोठी खेळी खेळली आहे. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी, त्यांचा देश भारत आणि चीनला तेल पुरवठा वाढवण्यासाठी तयार असल्याचं म्हटलंय. जगाचं लक्ष होर्मुजवर असताना रशियाची ही घोषणा भारतासारख्या मोठ्या आयातदार देशासाठी दिलासादायक मानली जातेय.

रशियाची ऑफर

रशिया आधीच भारताचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार देश बनला आहे. फेब्रुवारीमध्येही भारताने रशियाकडून दररोज सुमारे १० लाख बॅरल कच्चं तेल आयात केलं. जानेवारीच्या तुलनेत हे प्रमाण थोडं कमी असलं, तरी रशिया अव्वल स्थानी कायम राहिला. दुसरीकडे, सौदी अरेबियानंही आपला पुरवठा वाढवला असून फेब्रुवारीमध्ये भारताला सुमारे ३०% जास्त तेल पाठवलं. असं असूनही रशियाने आपली पकड घट्ट ठेवली आहे. आता रशियाच्या या नवीन विधानातून असे संकेत मिळत आहेत की, जर होर्मुजमधील परिस्थिती बिघडली, तर ते भारत आणि चीनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त कच्चं तेल उपलब्ध करून देऊ शकतात.

'Big Daddy of SUVs' महिंद्रा Scorpio-N घरी आणायची आहे? जाणून घ्या किती असावा तुमचा पगार आणि EMI चं गणित

होर्मुजमधील वाढता तणाव

होर्मुजची सामुद्रधुनी हा जगातील एक महत्त्वाचा सागरी मार्ग आहे, जिथून मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं (IRGC) दावा केला आहे की, या जलमार्गावर त्यांचं पूर्ण नियंत्रण आहे. तसंच, येथून जाणाऱ्या जहाजांना क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ल्याचा धोका असू शकतो, असा इशाराही त्यांनी दिलाय. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की, अमेरिकन नौदल कच्च्या तेलाच्या टँकर्सना सुरक्षित मार्ग देण्यासाठी तयार आहे. या विधानांमुळे या क्षेत्रातील तणाव आणखी वाढलाय.

भारतावर किती परिणाम?

भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेचा मोठा हिस्सा आयात करतो. दररोज सुमारे २.५ ते २.७ दशलक्ष बॅरल कच्चं तेल होर्मुजमार्गे भारतात पोहोचतं. यामध्ये इराक, सौदी अरेबिया, युएई आणि कुवेत यांसारख्या देशांचा मोठा वाटा आहे. जर या मार्गातील अडथळा जास्त काळ राहिला, तर भारताचा पुरवठा प्रभावित होऊ शकतो. याच कारणामुळे भारतीय रिफायनरी कंपन्या पर्यायी स्त्रोतांचा शोध घेत आहेत.

Web Title : ईरान तनाव के बीच रूस ने भारत, चीन को तेल आपूर्ति का प्रस्ताव दिया

Web Summary : ईरान तनाव के बीच तेल बाजारों पर असर पड़ रहा है, रूस ने भारत और चीन को कच्चे तेल की आपूर्ति बढ़ाने की पेशकश की है। होर्मुज जलसंधि को लेकर अनिश्चितता के बीच यह कदम भारत जैसे आयातक देशों को राहत देगा। रूस पहले से ही भारत का शीर्ष तेल आपूर्तिकर्ता है।

Web Title : Russia offers India, China oil amid Iran tensions: Key points

Web Summary : Amidst Iran tensions impacting oil markets, Russia offers India and China increased crude oil supply. This move provides reassurance for major importers like India, especially with uncertainty surrounding the Strait of Hormuz. Russia is already India's top oil supplier.