Lokmat Money > बिझनेस न्यूज > डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर गेला रुपया, काय होऊ शकतो परिणाम?

डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर गेला रुपया, काय होऊ शकतो परिणाम?

शुक्रवारी कामकाजादरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य घसरलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 14:05 IST2023-11-24T14:02:30+5:302023-11-24T14:05:35+5:30

शुक्रवारी कामकाजादरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य घसरलं.

Rupee hits all time low against dollar what could be the result crude oil loans jobs | डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर गेला रुपया, काय होऊ शकतो परिणाम?

डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर गेला रुपया, काय होऊ शकतो परिणाम?

Dollar Vs Rupee: डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य सातत्यानं घसरताना दिसतंय. शुक्रवारी कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २ पैशांनी घसरून ८३.३६ या आजवरच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. रुपयाच्या या घसरणीचा परिणाम सर्वसामान्यांवरही होतो. रुपया कमकुवत झाल्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होऊ शकतात आणि परदेशात शिक्षण घेणंही महाग होईल.

आज इंटरबँक फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.३३ वर उघडला. नंतर सुरुवातीच्या व्यवहारांनंतर तो प्रति डॉलर ८३.३६ पर्यंत पोहोचला, जे मागील बंद किंमतीपेक्षा दोन पैशांनी कमी आहे. गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.३४ वर बंद झाला होता.

दरम्यान, जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शविणारा डॉलर निर्देशांक ०.१२ टक्क्यांनी घसरून १०३.७९ वर आला. जागतिक इंधन बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.०६ टक्क्यांनी घसरून ८१.३७ डॉलर्स प्रति बॅरलवर व्यापार करत आहे.

कुठे होऊ शकतो परिणाम?
भारत तब्बल ६० टक्के खाद्यतेलाची आयात करतो. याची खरेदी डॉलर्समध्ये केली जाते. रुपयाची किंमत घसरल्यानं खाद्य तेलांच्या बाजारातील किंमती वाढू शकतात. भारत ८० टक्के कच्च्या तेलाचीही आयत करतो. याचे पैसेही डॉलर्समध्ये द्यावे लागतात. त्यामुळे याच्या किंमतीवरही परिणाम होऊ शकतो.

औषधं आणि इलेक्ट्रॉनिक सामान
बहुतांश मोबाइल आणि गॅजेट्सची आयात चीन आणि अन्य पूर्व एशियातील ठिकाणांहून केली जाते. जर डॉलरच्या तुलनेत रुपया असाच घसरत राहिला तर आयातीचा खर्च वाढेल.

परदेशात शिक्षण
परदेशात शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा राहण्याचा खर्च, कॉलेजची फी, खाण्यापिण्याचा खर्ज, वाहतूकीचा खर्च सर्व डॉलर्समध्ये करावा लागते. रुपया घसरल्यास यासाठी अधिक खर्च करावा लागेल.

रोजगाराच्या संधी
भारतीय कंपन्या परदेशातून कमी व्याजदरात मोठ्या प्रमाणात कर्ज घेत असतात. रुपयाचं मूल्य घसरल्यास कर्ज मिळवणं महाग होतं. यामुळे  खर्च वाढतो आणि अशामुळे विस्ताराच्या योजना टाळल्या जाऊ शकतात. यामुळे रोजगाराच्या संधीही कमी होण्याची शक्यता असते.

Web Title: Rupee hits all time low against dollar what could be the result crude oil loans jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.