lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Royal Enfield, ‌Bajaj आणि TVS ने 'या' लोकप्रिय बाईक्सच्या किंमतीत केली वाढ

Royal Enfield, ‌Bajaj आणि TVS ने 'या' लोकप्रिय बाईक्सच्या किंमतीत केली वाढ

नव्या वर्षाच्या सुरूवातील ग्राहकांच्या खिशाला कात्री

By जयदीप दाभोळकर | Published: January 12, 2021 02:56 PM2021-01-12T14:56:15+5:302021-01-12T14:57:49+5:30

नव्या वर्षाच्या सुरूवातील ग्राहकांच्या खिशाला कात्री

Royal Enfield Bajaj and TVS have increased the price of popular bikes new year | Royal Enfield, ‌Bajaj आणि TVS ने 'या' लोकप्रिय बाईक्सच्या किंमतीत केली वाढ

Royal Enfield, ‌Bajaj आणि TVS ने 'या' लोकप्रिय बाईक्सच्या किंमतीत केली वाढ

Highlightsनव्या वर्षांच्या सुरूवातीला ग्राहकांच्या खिशाला कात्रीअनेक लोकप्रिय बाईक्सच्या किंमतीत वाढ

बाईक्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. Royal Enfield, ‌Bajaj आणि TVS या कंपन्यांनी आपल्या काही स्पोर्ट्स आणि क्रुझरसोबतच अॅडव्हेंचर सेगमेंटमधल्या काही लोकप्रिय बाईक्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयल एनफिल्डनं आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक्स Classic 350 आणि Bullet सोबतच नुकतील लाँच केलेली Meteor 350 च्या मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे VS Motors ने Apache Series Bikes च्या किंमती वाढवल्या आहेत. तर देशातील नावाजलेली कंपनी Bajaj Auto ने आपली क्रुझर बाइक Avengers सोबकच स्पोर्ट्स बाइक Dominar ची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

स्वदेशी कंपनी Royal Enfield लं आपल्या सर्वात लोकप्रिय असलेल्या बाईक्स RE Classic 350 च्या सर्वच व्हेरिअंटमध्ये २ हजार रूपयांची वाढ केली आहे. दरवाढीनंतर या बाईक्सची किंमत १.६३ लाखांपासून १.८५ लाख इतकी झाली आहे. तर कंपनीनं आपल्या Bullet सीरिजच्या बाईक्सच्याही किंमतीत वाढ केली आहे. यानंतर या बाईक्सची किंमत १.२७ लाखांपासून १.४३ लाखांपर्यंत गेली आहे. 



तर दुसरीकडे RE Classic 350 च्या किंमतीतही कंपनीनं ३ हजार रूपयांची वाढ केली आहे. यानंतर या सर्व व्हेरिअंट्सची किंमत १.७८ लाख रूपयांपासून १.९३ लाख रूपयांपर्यंत गेली आहे. मीटिअर फायरबॉल व्हेरिअंटची किंमत १.७८ लाख रूपये तर मीटिअर स्टेलरची किंमत १.८४ लाख आणि सुपरनोव्हाची किंमत १.९३ लाख रूपये इतकी झाली आहे. 



बजाजकडूनही किंमतीत वाढ


रॉयल एनफिल्ड पाठोपाठ बजाजनंही Avenger Cruiser 220 सोबतच Pulsar Series आणि Dominar 400, Dominar 250 या बाईक्सचेही दर वाढवले आहेत. कंपनीनं एव्हेंजर क्रुझर २२० च्या किंमतीत ३,५२१ रूपयांची वाढ केली आहे. त्यानंतर या बाईकची एक्स शोरूम किंमत १.२४ लाख रूपये इतकी झाली आहे. तर दुसरीकडे Dominar 400 च्या किंमतीत ३,४८० रूपये आणि Dominar 250 च्या किंमतीत ३,५०० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. बजाजनं Pulsar 220F च्या किंमतीत ३,५०० रूपये, Pulsar NS160 च्या किंमतीत ३ हजार रूपये आणि Pulsar NS200 किंमतीत ३,५०० रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 



TVS कडूनही किंमतीत वाढ


TVS Motor Company ने आपल्या फ्लॅगशिप Apache Series च्या बाईक्सच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं Apache RR 310 च्या किंमतीत ३ हजार रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर या गाडीची किंमत २.४८ लाख (एक्स शोरूम) इतकी झाली आहे. तर दुसरीकडे Apache RTR 200 4V च्या किंमतीत २ हजार रूपये आणि Apache RTR 160 4V च्या किंमतीत १,७७० रूपयांची वाढ करण्यात आली. तसंच Apache RTR 180 आणि Apache RTR 160 च्या किंमतीत अनुक्रमे १,७७० रूपये आणि १,५२० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. 

Web Title: Royal Enfield Bajaj and TVS have increased the price of popular bikes new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.