नवी दिल्ली : राजघराण्यांचा वारसा लाभलेला ‘गोवळकोंडा ब्ल्यू’ नामक अत्यंत दुर्मीळ हिऱ्याचा १४ मे रोजी जिनेव्हा येथील ‘क्रिस्टीज’च्या ‘मॅग्निफिकंट ज्वेल्स’मध्ये प्रथमच लिलाव होणार आहे. ‘गोवळकोंडा ब्लू’ हिरा एकेकाळी इंदौर आणि बड़ौदा येथील महाराजांच्या संग्रही होता.
२३.२४ कॅरेटच्या या नीलरत्नास लिलावात ३०० ते ४३० कोटी रुपयांपर्यंत किंमत येऊ शकते, असा अंदाज आहे. हा हिरा इंदौरचे महाराजा यशवंतराव होळकर द्वितीय यांच्या मालकीचा होता नंतर तो बडोद्याचे महाराजांकडे आला.