Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी

Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी

Iran War Ceasefire Crude Oil Price: अमेरिकेनं इराणसोबत शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाचे दर वेगानं घसरून १०० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आलेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 08:28 IST2026-04-08T08:26:46+5:302026-04-08T08:28:59+5:30

Iran War Ceasefire Crude Oil Price: अमेरिकेनं इराणसोबत शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाचे दर वेगानं घसरून १०० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आलेत.

Relief from the announcement of a ceasefire in the Iran us israel war gift nifty up Big drop in crude oil price and bumper rise in the American market | Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी

Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी

Iran War Ceasefire Crude Oil Price: अमेरिकेनं इराणसोबत शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाचे दर वेगानं घसरून १०० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आलेत, तर अमेरिकन शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराण युद्धात दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर आर्थिक आघाड्यांवर मोठे बदल झालेत. डाऊ जोन्स फ्युचर्स ९०० अंकांनी वधारला आहे. आज बाजार उघडल्यानंतर भारत आणि आशियाई बाजारातही अशीच तेजी दिसून येऊ शकते; गिफ्ट निफ्टी (GIFT Nifty) ग्रीन झोनमध्ये आल्यानं अशाच प्रकारचे संकेत मिळत आहेत.

कच्च्या तेलाच्या दरात २० डॉलरची घसरण

बुधवारी अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) कच्च्या तेलाची किंमत सुमारे २० डॉलर प्रति बॅरलनं घसरली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाल्याचं सांगितल्यानंतर हे बदल झाले. 'होर्मुझची सामुद्रधुनी' तातडीनं आणि सुरक्षितपणं पुन्हा उघडली जाईल, या अटीवर हा करार आधारित आहे. मे महिन्याच्या डिलिव्हरीसाठी WTI क्रूडची किंमत १८.१० डॉलर किंवा १६.०२% नी घसरून ९४.८५ डॉलर प्रति बॅरल झाली आहे. २६ मार्चनंतर ही किंमत ९१.०५ डॉलर या नीचांकी स्तरावर पोहोचली होती.

डेडलाइनपूर्वी शस्त्रसंधीची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी दिलेली मुदत संपण्यापूर्वीच ही शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे. या जलमार्गातून जगातील सुमारे २०% तेलाची वाहतूक होते, त्यामुळे या क्षेत्राचं महत्त्व सर्वाधिक आहे.

Web Title : ईरान युद्धविराम से बाजार में उछाल: तेल गिरा, अमेरिकी शेयर बढ़े

Web Summary : ईरान-अमेरिका युद्धविराम से बाजार में तेजी। तेल की कीमतें 100 डॉलर प्रति बैरल से नीचे गिरीं। डाऊ जोन्स फ्यूचर्स में 900 अंकों की उछाल, एशियाई बाजारों के लिए सकारात्मक संकेत। युद्धविराम के बाद डब्ल्यूटीआई क्रूड 20 डॉलर गिरा।

Web Title : Iran Ceasefire Boosts Markets: Oil Plummets, US Stocks Surge

Web Summary : US-Iran ceasefire sparks market rally. Oil prices crash below $100/barrel. Dow Jones futures jump 900 points, signaling positive trends for Asian markets. WTI crude falls $20 after ceasefire agreed, reopening the Strait of Hormuz.