Lokmat Money > बिझनेस न्यूज > लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी

लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी

UCO Bank Home Loan Rate: सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेनं आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. वास्तविक, बँक आता आपल्या ग्राहकांना स्वस्तात कर्ज देणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 09:36 IST2025-09-11T09:36:17+5:302025-09-11T09:36:56+5:30

UCO Bank Home Loan Rate: सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेनं आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. वास्तविक, बँक आता आपल्या ग्राहकांना स्वस्तात कर्ज देणार आहे.

Relief for loan takers uco government bank has made loan rates cheaper EMI burden will be reduced | लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी

लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी

UCO Bank Home Loan Rate: सार्वजनिक क्षेत्रातील युको बँकेनं आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. वास्तविक, बँक आता आपल्या ग्राहकांना स्वस्तात कर्ज देणार आहे. बँकेनं कर्जावरील व्याजदर कमी केलेत. बँकेनं मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच एमसीएलआरमध्ये ५ बेसिस पॉईंटनं म्हणजेच सर्व कालावधीसाठी ०.०५ टक्के कपात केली आहे.

हा बदल १० सप्टेंबरपासून लागू झाला आहे, अशी माहिती बँकेनं दिलीये. आता एक वर्षाचा एमसीएलआर ८.९५ टक्क्यांवरून ८.९० टक्के करण्यात आलाय. यासोबतच एक दिवस, एक महिना, ३ महिने आणि ६ महिन्यांच्या कालावधीच्या कर्जातही ०.०५ टक्के कपात करण्यात आलीये. मात्र, रेपो रेट, बेस रेट आणि बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (बीपीएलआर) यांच्याशी संबंधित दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं बँकेनं स्पष्ट केलंय.

केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा

काय असतो एमसीएलआर?

हा मानक दर आहे ज्यावर बहुतेक गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि कॉर्पोरेट कर्ज निश्चित केले जातात, म्हणजेच आता नवीन कर्जदार आणि रीसेट कालावधीत येणाऱ्या विद्यमान ग्राहकांना काही दिलासा मिळेल. अलीकडेच, आरबीआयनं ऑगस्ट २०२५ च्या पतधोरण रेपो दर ५.५ टक्क्यांवर स्थिर ठेवला होता, परंतु ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि स्पर्धा कायम ठेवण्यासाठी अनेक बँकांनी त्यांचे एमसीएलआर कमी केले आहेत.

या बँकांनीही दर केले कमी

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि बँक ऑफ इंडिया (बीओआय) यांनी कर्जावरील व्याज कमी केले आहे. दोन्ही बँकांनी १ सप्टेंबर २०२५ पासून एमसीएलआर कमी केला आहे. बँक ऑफ बडोदानं बुधवारी (१० सप्टेंबर) माहिती दिली की त्यांनी ओव्हरनाईट एमसीएलआर म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये १० बेसिस पॉईंटची कपात केली आहे. आता हा दर ७.८५ टक्के असेल आणि हा बदल १२ सप्टेंबरपासून लागू होईल.

Web Title: Relief for loan takers uco government bank has made loan rates cheaper EMI burden will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.