Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘रिलायन्स’चा उद्यापासून ‘डिजिटल डिस्काउंट डेज’ सेल

‘रिलायन्स’चा उद्यापासून ‘डिजिटल डिस्काउंट डेज’ सेल

Reliance's 'Digital Discount Days' : रिलायन्स डिजिटलने सर्वांत मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स विक्रीची अर्थात ‘डिजिटल डिस्काउंट डेज’ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ६ ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान ग्राहकांना विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या किमतींत खरेदी करता येतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 06:05 IST2024-04-06T06:05:24+5:302024-04-06T06:05:42+5:30

Reliance's 'Digital Discount Days' : रिलायन्स डिजिटलने सर्वांत मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स विक्रीची अर्थात ‘डिजिटल डिस्काउंट डेज’ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ६ ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान ग्राहकांना विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या किमतींत खरेदी करता येतील.

Reliance's 'Digital Discount Days' sale from tomorrow | ‘रिलायन्स’चा उद्यापासून ‘डिजिटल डिस्काउंट डेज’ सेल

‘रिलायन्स’चा उद्यापासून ‘डिजिटल डिस्काउंट डेज’ सेल

मुंबई - रिलायन्स डिजिटलने सर्वांत मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स विक्रीची अर्थात ‘डिजिटल डिस्काउंट डेज’ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ६ ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान ग्राहकांना विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या किमतींत खरेदी करता येतील. ही सुविधा ग्राहकांना सर्व रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि माय जिओ स्टोअर्समध्ये उपलब्ध असणार आहे. 

या सेलदरम्यान ग्राहकांंना बँक कार्डस्वर आकर्षक सूट दिली जाणार आहे. विविध कन्झ्युमर ड्युरेबल लोन्सवर आकर्षक कॅशबॅक दिला जाणार आहे. 
टीव्ही पाहण्याची मजा अनुभवण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यांच्या एलईडी टीव्ही खरेदीवर मोठी सूट दिली जाणार आहे. ग्राहकांना आपले स्मार्टफोन अपग्रेड करण्याची संधी या सेलमध्ये मिळणार आहे. लॅपटॉप तसेच मकबुकवर आकर्षक सवलतींसोबत नो कॉस्ट ईएमआयची सुविधा दिली जाणार आहे. डॉल्बी ॲटमॉस साउंड बारवर मोठी सूट दिली जाणार आहे. विविध कंपन्यांचे इन्व्हर्टर एसी, हाय-एंड वॉशर ड्रायर, रेफ्रिजरेटर्सच्या खरेदीवरही ग्राहकांना आकर्षक सवलती दिल्या जाणार आहेत. 

रिलायन्स डिजिटल हे भारतातील सर्वांत मोठे इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल स्टोअर आहे. ८०० पेक्षा जास्त शहरांमध्ये रिलायन्स डिजिटल स्टोअर्स व माय जिओ स्टोअर्स ग्राहकांना सेवा पुरवत आहेत. ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ब्रँड्स आणि ५ हजारांहून अधिक उत्पादने इथे उपलब्ध आहेत. (वा. प्र.)

Web Title: Reliance's 'Digital Discount Days' sale from tomorrow