Reliance Q1 Results: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजनं आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत (Q1FY26) जबरदस्त नफा कमावला आहे. कंपनीचा निव्वळ नफा ७८.३२% नं वाढून २६,९९४ कोटी रुपये झाला आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १५,१३८ कोटी रुपये होता.
कंपनीच्या एकूण ऑपरेशनल उत्पन्नातही वाढ झाली आहे. रिलायन्सचा आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत २,४८,६६० कोटी रुपयांचा परिचालन महसूल होता, जो गेल्या वर्षीच्या आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत २,३६,२१७ कोटी रुपये होता. म्हणजेच, वार्षिक आधारावर यात ५.२७% वाढ झाली आहे.
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
निकालांमुळे मुकेश अंबानी खूश
रिलायन्सनं २०२६ या आर्थिक वर्षाची सुरुवात सर्व बाबतीत मजबूत आणि चांगल्या कामगिरीने केली आहे. जगभरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत अस्थिर राहिली असली तरीही, २०२६ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकूण EBITDA गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढला आहे. किरकोळ व्यवसायातील आमचा ग्राहक आधार ३५.८ कोटींपर्यंत वाढलाय. आमच्या कामकाजातही अनेक सुधारणा झाल्या आहेत, असं यावेळी मुकेश अंबानी म्हणाले. भारतीय ग्राहकांच्या आवडीनुसार चांगली उत्पादनं देण्यासाठी आम्ही आमच्या स्वतःच्या FMCG ब्रँडवर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत. आमचा किरकोळ व्यवसाय सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक मजबूत होत आहेत, असंही ते म्हणाले.
रिटेल व्यवसाय
रिलायन्स रिटेलचा महसूल ८४,१७१ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, जो गेल्या वर्षीपेक्षा ११.३% अधिक आहे. कंपनीचा EBITDA देखील वाढून ६,३८१ कोटी रुपये झाला आहे.
रिलायन्स जिओ
जिओने २०० मिलियन (२० कोटी) ५जी ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे आणि त्यांच्या होम ब्रॉडबँड कनेक्शननंही २ कोटींचा टप्पा ओलांडलाय. JioAirFiber आता जगातील सर्वात मोठी FWA (फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस) सेवा बनली आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा EBITDA २४% नं वाढून १८,१३५ कोटी रुपये झाला आणि मार्जिनमध्येही २१० बेसिस पॉइंट्सची सुधारणा झाली. जिओ हॉटस्टारनं आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आयपीएलचं आयोजन केलं होतं.
ऑईल आणि गॅस सेगमेंट
या विभागानं आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत स्थिर कामगिरी केली आहे. EBITDA ४,९९६ कोटी रुपये होता, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ५,२१० कोटी रुपये होता.