Lokmat Money > बिझनेस न्यूज > Reliance च्या या शेअरनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं; FII कडूनही विक्री, एक्सपर्ट म्हणाले...

Reliance च्या या शेअरनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं; FII कडूनही विक्री, एक्सपर्ट म्हणाले...

Jio Financial Share Price: गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे किरकोळ गुंतवणूकदार हैराण झाले आहेत. बाजारात सातत्यानं घसरण होत होती आणि त्याचवेळी किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठ्या अपेक्षेने खरेदी केलेले काही शेअर्सही मोठ्या प्रमाणात घसरले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:06 IST2025-02-12T15:59:08+5:302025-02-12T16:06:15+5:30

Jio Financial Share Price: गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे किरकोळ गुंतवणूकदार हैराण झाले आहेत. बाजारात सातत्यानं घसरण होत होती आणि त्याचवेळी किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठ्या अपेक्षेने खरेदी केलेले काही शेअर्सही मोठ्या प्रमाणात घसरले.

Reliance Jio Financial Share disappointed investors expectations FIIs also sold experts said to hold | Reliance च्या या शेअरनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं; FII कडूनही विक्री, एक्सपर्ट म्हणाले...

Reliance च्या या शेअरनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं; FII कडूनही विक्री, एक्सपर्ट म्हणाले...

Jio Financial Share Price: गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे किरकोळ गुंतवणूकदार हैराण झाले आहेत. बाजारात सातत्यानं घसरण होत होती आणि त्याचवेळी किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठ्या अपेक्षेने खरेदी केलेले काही शेअर्सही मोठ्या प्रमाणात घसरले. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस (Jio Financial Services) हा असा शेअर आहे ज्यात किरकोळ गुंतवणूकदारांनी वाढ आणि घसरण अशा दोन्ही परिस्थितीत खरेदी केली, परंतु आता या शेअरची सातत्यानं होणारी घसरण ही गुंतवणूकदारांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Jio Financial Services चा शेअर बुधवारी ३.१० टक्क्यांनी घसरून २२३.२३ रुपयांवर आला. ही पातळी या शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी आहे. या कंपनीचे मार्केट कॅप १.४५ लाख कोटी रुपये आहे. या शेअरमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा २४.६ टक्के हिस्सा असून हा किरकोळ गुंतवणूकदारांचा आवडता शेअर आहे. मात्र, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअरमध्ये सातत्यानं होत असलेल्या घसरणीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसमोरील समस्या वाढल्यात.

डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत एफआयआयनेही शेअरमध्ये विक्री केली आणि आपला हिस्सा १६.९% वरून १५.६% पर्यंत कमी केला. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरनं बुधवारी ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गाठली. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने २३३ रुपयांवर सुरुवात केली आणि एनएसईवर ५ टक्क्यांहून अधिक घसरणीसह २३३.२३ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस २३ एप्रिल २०२४ रोजी एनएसईवर ३९४.७९० रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून सुमारे ४५ टक्क्यांनी घसरलाय.

काय म्हणाले तज्ज्ञ?

स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे संतोष मीणा यांनी ईटी नाऊ स्वदेशशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस अजूनही व्हॅल्यू सर्च मोडमध्ये आहे. हा शेअर ३९४ रुपयांच्या वरवरून खाली आला आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस म्युच्युअल फंड व्यवसाय, जिओफायनान्स अॅप अशा नवीन व्यवसायांमध्ये प्रवेश करून आपल्या सेवांचा विस्तार करत आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स दीर्घ मुदतीसाठी चांगले आहेत. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्याची क्षमता आहे, परंतु अल्पावधीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये काही अनिश्चितता दिसू शकते. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस हा खूप चांगला शेअर आहे. जर तुम्हाला दीर्घ काळासाठी म्हणजे ५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर शेअर होल्ड करता येऊ शकतो, असंही ते म्हणाले.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीत मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Reliance Jio Financial Share disappointed investors expectations FIIs also sold experts said to hold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.