Rekha Jhunjhunwala Stock: फेडरल बँकेचे शेअर्स (Federal Bank Shares) ५२ आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले आहेत. मंगळवारी बीएसईवर फेडरल बँकेचे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक तेजीसह ₹२४६.५५ वर पोहोचले. गेल्या दोन महिन्यांत फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये २४ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या खासगी बँकेचे शेअर्स ₹३२० पर्यंत जाऊ शकतात. दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील फेडरल बँकेतील आपला हिस्सा वाढवलाय. फेडरल बँकेच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ₹१७२.९५ आहे.
बँकेचे शेअर्स ₹३२० पर्यंत जाण्याची शक्यता
फोर्ट कॅपिटलचे (Fort Capital) वरिष्ठ फंड मॅनेजर पराग ठक्कर यांचा फेडरल बँकेवर बुलिश आउटलुक आहे. त्यांचा अंदाज आहे की, फेडरल बँकेचे शेअर्स पुढील वर्षापर्यंत ₹३०० ते ₹३२० पर्यंत जाऊ शकतात. सीएनबीसी-टीव्ही १८ (CNBC-TV18) च्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. फेडरल बँकेने नुकतीच घोषणा केली होती की ब्लॅकस्टोन (Blackstone) या बँकेत सुमारे ७०५ मिलियनची गुंतवणूक करेल. ब्लॅकस्टोन फेडरल बँकेत ९.९ टक्के हिस्सा घेणार आहे. या करारामुळे ही आंतरराष्ट्रीय खासगी इक्विटी फर्म बँकेतील सर्वात मोठी भागधारक बनेल. खासगी क्षेत्रातील फेडरल बँकेचे बाजार भांडवल मंगळवारी ₹६०,५०० कोटींच्या पलीकडे पोहोचलं.
तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ५ कोटींहून अधिक शेअर्स
दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांचा खासगी क्षेत्रातील फेडरल बँकेत मोठी गुंतवणूक आहे. सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीपर्यंतच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे फेडरल बँकेचे ५९,०३०,०६० शेअर्स आहेत. फेडरल बँकेत झुनझुनवाला यांचा २.४२ टक्के हिस्सा आहे. जुलै-सप्टेंबर २०२५ तिमाही दरम्यान फेडरल बँकेत रेखा झुनझुनवाला यांचा हिस्सा वाढला. यापूर्वी, जून २०२५ च्या तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे फेडरल बँकेचे ३६,०३०,०६० शेअर्स होते, म्हणजेच बँकेत दिग्गज गुंतवणूकदारांचा हिस्सा १.४८ टक्के होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
