Lokmat Money > बिझनेस न्यूज > अ‍ॅपलनंतर 'ही' स्मार्टफोन कंपनी बनवणार 'मेड इन इंडिया' डिव्हाइस; देशातील ५वा सर्वात मोठा ब्रँड

अ‍ॅपलनंतर 'ही' स्मार्टफोन कंपनी बनवणार 'मेड इन इंडिया' डिव्हाइस; देशातील ५वा सर्वात मोठा ब्रँड

realme optimus partnership : अमेरिकन स्मार्टफोन ब्रँड अ‍ॅपलनंतर आता चीनमधील एक मोठी स्मार्टफोन ब्रँड कंपनी भारतात उपकरणांचे उत्पादन करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:12 IST2025-04-16T14:35:50+5:302025-04-16T15:12:14+5:30

realme optimus partnership : अमेरिकन स्मार्टफोन ब्रँड अ‍ॅपलनंतर आता चीनमधील एक मोठी स्मार्टफोन ब्रँड कंपनी भारतात उपकरणांचे उत्पादन करणार आहे.

realme optimus partnership to make india global tech hub | अ‍ॅपलनंतर 'ही' स्मार्टफोन कंपनी बनवणार 'मेड इन इंडिया' डिव्हाइस; देशातील ५वा सर्वात मोठा ब्रँड

अ‍ॅपलनंतर 'ही' स्मार्टफोन कंपनी बनवणार 'मेड इन इंडिया' डिव्हाइस; देशातील ५वा सर्वात मोठा ब्रँड

realme optimus partnership : भारत हळूहळू उत्पादन क्षेत्राचे केंद्र (Manufacturing Hub) बनत चालला आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारताकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहत आहेत. अ‍ॅपलसारख्या मोठ्या कंपनीनेही आपल्या आयफोनची निर्मिती भारतात सुरू केली आहे. लवकरच मेड इन टेस्ला कारही रस्त्यांवर धावताना पाहायला मिळणार आहे. पण, आता चीनमधील एक मोठी स्मार्टफोन कंपनी भारतात येण्यास उत्सुक आहे. कंपनी दरवर्षी ५० लाख स्मार्ट डिव्हाइसची निर्मिती करण्याचा मानस आहे. या मेगा प्रोजेक्टमुळे २००० हून अधिक लोकांना रोजगार मिळेल. याशिवाय, भारताला जागतिक तंत्रज्ञान उत्पादन केंद्र बनवण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावेल.

रिअलमी बनवणार 'मेक इन इंडिया' प्रॉडक्ट
देशातील पाचव्या क्रमांकाचा स्मार्टफोन ब्रँड असलेला रिअलमी आता 'मेक इन इंडिया' प्रॉडक्टची निर्मिती करणार आहे. कंपनीने ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत हातमिळवणी केली आहे. या भागीदारीत, रिअलमी भारतात इअरफोन, स्मार्टवॉच आणि टॅब्लेट सारखे AIoT डिव्हाइस तयार करेल. रिअलमीने स्मार्ट उपकरणांचे उत्पादन देखील सुरू केले आहे.

रिअलमीचे उद्दिष्ट देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करणे देखील आहे. कंपनी आता देशातूनच PCBA, बॅटरी, चार्जर आणि यांत्रिक भाग खरेदी करण्याची योजना आखत आहे. जर असे झाले तर भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला एक नवीन गती आणि दिशा मिळेल. जगभरातील बाजारपेठांमध्ये 'मेड इन इंडिया' एआयओटी उपकरणे आणण्याचे आणि भारताला जागतिक इनोव्हेशन केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे रिअलमीचे म्हणणे आहे.

वाचा - तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या SIP चे १० सीक्रेट; कोट्यधीश होण्याचे गणित समजून घ्या

भारत बनणार प्रमुख निर्यात केंद्र?
ट्रम्प टॅरिफमुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेकडे आपला मोर्चा वळवला आहे. यावर्षी अ‍ॅपल कंपनीने २२ लाख आयफोनची निर्यात भारतातून केली. रिअलमीच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारतात उच्च-तंत्रज्ञान उत्पादने तयार करण्याचे आणि संपूर्ण जगाला त्यांचा पुरवठा करण्याचे आमचे ध्येय आहे. यामुळे केवळ देशांतर्गत मागणी पूर्ण होणार नाही तर भारत एक प्रमुख निर्यात केंद्र देखील बनेल.

Web Title: realme optimus partnership to make india global tech hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.